Thursday, November 21, 2024
Homeकल्चर +राज्य मराठी चित्रपट...

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान

मुंबईतल्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात काल मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि कंठसंगीतासाठी गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ शिवाजी साटम, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ आशा पारेख यांना तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ एन. चंद्रा यांना प्रदान करण्यात आले.

वितरीत करण्यात आलेले इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट कथा:  शंतनू रोडे (गोष्ट एका पैठणीची)

पटकथा: मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक)

उत्कृष्ट संवाद:  शंतनू रोडे (गोष्ट एका पैठणीची)

उत्कृष्ट गीते: गुरु ठाकूर (बापल्योक)

उत्कृष्ट संगीत:  राहुल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:  विजय गवंडे (बापल्योक)

उत्कृष्ट पार्श्वगायक:  राहुल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट पार्श्वगायिका:  प्राची रेगे (गोदाकाठ)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक: सुजितकुमार (चोरीचा मामला)

उत्कृष्ट अभिनेता:  राहुल देशपांडे (मी वसंतराव)

उत्कृष्ट अभिनेत्री:  मृण्मयी गोडबोले (गोदाकाठ)

उत्कृष्ट विनोदी अभिनेता: जितेंद्र जोशी (चोरीचा मामला)

सहाय्यक अभिनेता: विठ्ठल काळे (बापल्योक)

सहाय्यक अभिनेत्री: प्रेमा साखरदांडे (फनरल)

प्रथम पदार्पण अभिनेता: ऋतुराज वानखेडे (जयंती)

मराठी

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री: पल्लवी पालकर (फास)

५९वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट कथा: मंगेश जोशी, अर्चना बोराडे (कारखानिसांची वारी)

उत्कृष्ट पटकथा: रसिका आगासे (तिचं शहर होणं)

उत्कृष्ट संवाद: नितीन नंदन (बाल भारती)

उत्कृष्ट गीते: जितेंद्र जोशी (गोदावरी)

उत्कृष्ट संगीत: अमित राज (झिम्मा)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:  सारंग कुलकर्णी (कारखानिसांची वारी) 

उत्कृष्ट पार्श्वगायक: राहुल देशपांडे (गोदावरी)

उत्कृष्ट पार्श्वगायिका: आनंदी जोशी (रंगिले फंटर)

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक: फुलवा खामकर (लक डाऊन be positive)

उत्कृष्ट अभिनेता: जितेंद्र जोशी (गोदावरी)

उत्कृष्ट अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (तिचं शहर होणं)

मराठी

उत्कृष्ट विनोदी अभिनेता: भालचंद्र कदम (पांडू)

सहाय्यक अभिनेता: अमेय वाघ (फ्रेम)

सहाय्यक अभिनेत्री: हेमांगी कवी (तिचं शहर होणं)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता: योगेश खिल्लारे (इंटरनॅशनल फालमफोक)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री: श्रुती उबाले (भ्रमणध्वनी)

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: निर्मिती सावंत (झिम्मा)

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content