Friday, October 18, 2024
Homeकल्चर +उद्यापासून मुंबईत महाराष्ट्र...

उद्यापासून मुंबईत महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे आयोजित २०वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा मुंबई केंद्रावर उद्या, ९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे प्राथमिक फेरीमध्ये मुंबई जिल्ह्यातून एकूण २५ नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.  

मंगळवार दि. ९ जाने. स. १० वा. देवा श्री गणेशा, लेखक व दिग्दर्शक: वर्षा राणे, अथर्व फाऊंडेशन. स. ११:१५ वा. होत्या काही चिमण्या!, लेखक: निलेश गोपनारायण, दिग्दर्शक: संग्राम मोरे, आत्मा मलिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज. दु. १२:३० वा. दिव्यांग, लेखक व दिग्दर्शक: अजय पाटील, जिल्हा परिषद शाळा, राहनाळ. दु. १:४५ वा. सत्य जे विलुप्त, लेखक: अंकित म्हात्रे, दिग्दर्शक: अनिकेत भोईर, चाईल्ड अकॅडमी, मालाड. दु. ३ वा. लाईक, कमेंट आणि शेअर, लेखक: अभय पाटील, दिग्दर्शक: विनायक सावर्डेकर, अमर हिंद मंडळ, दादर. सायं. ४:१५ वा. पूर्णब्रह्म, लेखक: सुनील चव्हाण, दिग्दर्शक: स्नेहा चव्हाण, बाल समाजोत्रती मंडळ.

बुधवार दि. १० जाने. स. १० वा. फुलवा मधुर बहार, लेखक: विद्याधर गोखले, दिग्दर्शक: वर्षा भावे, कलांगण. स. ११:१५ वा. मोबाईल मोबाईल, लेखक: गोविंद गोडबोले, दिग्दर्शक: भक्ती डांगे, जे.इ.एस. इंग्लिश स्कूल. दु. १२:३० वा. रिले, लेखक: संतोष माकुडे, दिग्दर्शक: प्रसाद खडके, जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी, जोगेश्वरी. दु. १:४५ वा. अजब लोठ्याची महान गोष्ट, लेखक: संकेत तांडेल, दिग्दर्शक: डॉ. अभिनय देसाई, एम. जी. परुळेकर मित्र मंडळ. दु. ३ वा. स्वप्न राधेचे, लेखक: मनोज आचार्य, दिग्दर्शक: प्रशांत गुरव, मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ. सायं. ४ वा. काजवे, लेखक व दिग्दर्शक: अमोघ डाके, सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट.

गुरुवार दि. ११ जाने. स. १० वा. सोनेरी कोंबडा, काळं माकड आणि लाल पेरुचं झाड, लेखक: पंकज शर्मा, दिग्दर्शक: सचिन शिर्के पल्लवी फाऊंडेशन. स. ११:१५ वा. कणा, लेखक व दिग्दर्शक: अभिप्राय पारकर, प्रबोधन कुर्ला माध्यमिक शाळा. दु. १२:३० वा. जय हो फॅन्टसी, लेखक: असिफ अन्सारी, दिग्दर्शक: अर्जुन मचिवले, आर. एन. गांधी हायस्कूल. दु. १:४५ वा. ये गं ये गं परी!, लेखक: संदीप गचांडे, दिग्दर्शक: वैभव उबाळे, साई-स्पर्श संस्था, ठाणे. दु. ३ वा. वाटाड्या, लेखक व दिग्दर्शक: वैभव चव्हाण, संम्यक कलांश प्रतिष्ठान. सायं. ४:१५ वा. मी पास झालो, लेखक: समद शेख, दिग्दर्शक: तुषार वनगे, सुविधा प्रसारक संघाचे मनोहर हरिराम चौगुले विद्यालय. सायं. ५:३০ वा. कस्तुरी, लेखक व दिग्दर्शक: आसिफ अन्सारी, श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था.

शुकवार दि. १२ जाने. स. १० वा. मोल, लेखक व दिग्दर्शक: विश्वनाथ चांदोरकर (सुतार), सिद्धारूढ संस्था, ठाणे. स. ११:१५ वा. पॅडेल, लेखक व दिग्दर्शक: अजय पाटील, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल. दु. १२:३० वा. बुड्ढी के बाल, लेखक: ईशानी वर्तक, दिग्दर्शक: अधिराज करणे, सोमवंशी क्षत्रिय समाज, खुतोडी. दु. १:४५ वा. जीर्णोद्धार, लेखक: संध्या कुलकर्णी, दिग्दर्शक: तुषार वनगे, सुविद्या प्रसारक संघ सुविद्यालय. दु. ३ वा. कस्तुरी, लेखक: आसिफ अन्सारी, दिग्दर्शक: राजाराम छेडे, एस.बी.एस. इंग्लिश स्कूल. सायं. ४:१५ वा. इडिया घर, लेखक: राजेश देशपांडे, दिग्दर्शक: वनमाला वेंद्रे, ग्रामीण समाज प्रबोविनी हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्य बालनाट्य स्पर्धा संपन्न होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले. प्रवेश विनामूल्य असलेल्या या स्पर्धेस जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content