Homeचिट चॅटनचिकेत देवस्थळीच्या आवाजात...

नचिकेत देवस्थळीच्या आवाजात ऐका ‘सायको किलर’चा थरार!

तो येतोय.. संध्याकाळी दारावर कुणाची अनोळखी थाप पडली तर लगेच दार उघडू नका! नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात एकामागोमाग एक खुनांचं, हत्त्याकांडांचं गूढ सत्र सुरू झालंय. पोलिसांना या विचित्र गुन्ह्यांचा तपास काही केल्या लागत नाहीये. दुसरीकडे बातमीच्या नादात क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे या सगळ्या घटनाक्रमांत नकळतपणे गुंतत चाललाय. या चक्रव्युहात एकदा फसलं की जिवंत बाहेर पडणं अशक्य आहे! पण हे त्याला तरी कुठं माहितीय? एका बातमीवरून सुरू झालेला हा विचित्र प्रवास निलेशचा शेवटचा श्वास घेऊनच संपेल का?

‘स्टोरीटेल’वर गुरूवारी २३ सप्टेंबरला रिलीज झालेल्या ‘सायको किलर’ या क्राईम सिरीजचं हे उत्कंठावर्धक कथानक! निरंजन मेढेकरलिखित आणि अभिनेता नचिकेत देवस्थळी याच्या दमदार आवाजातल्या ‘सायको किलर’ला पहिल्या दिवसापासूनच श्रोत्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शहरात एकामागोमाग एक घडणाऱ्या हत्त्याकांडांभोवती आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून पोलिसांना तपासात मदत करणाऱ्या तरुण बातमीदाराभोवती या सिरीजची स्टोरीलाईन गुंफलेली आहे.

नचिकेत देवस्थळी

‘सायको किलर’च्या मानसिकतेचा अभ्यास करत पोलीस अखेर त्याच्यापर्यंत पोहोचतात का, शहरात एकामागोमाग एक सुरू असलेली हत्त्याकांडं थांबतात का, प्रसंगी या कादंबरीच्या नायकाला क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला आपल्या प्राणांची बाजी लावायला लागते का, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सायको किलर ऐकायलाच हवी!

या सिरीजचं कथानक पुण्यात घडलेल्या सगळ्यात मोठ्या हत्त्याकांडावरून प्रेरित आहे. निरंजन मेढेकर यांनी याआधी वेगवेगळ्या मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये बातमीदारी केलेली असल्यानं बातमीदार-पत्रकारांचा संघर्ष त्यांना परिचित आहे. त्यामुळं या सिरीजमध्ये मराठी पत्रकारितेचं आणि बातमीदारांच्या भावविश्वाचं वास्तवदर्शी चित्रण झालंय. याआधी निरंजन मेढेकर यांनी ‘सीरियल किलर’ आणि ‘विनाशकाले’ या दोन क्राईम सिरीज ‘स्टोरीटेल’साठी लिहिल्या असून त्यालाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘व्हायरस पुणे’ ही त्यांनी भावानुवाद केलेली ही सायफाय थ्रिलर सिरीज मुक्ता बर्वे यांच्या आवाजात प्रसिद्ध असून, ती श्रोत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

निरंजन मेढेकर

‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांमुळे तर सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ‘ती सध्या परत येतीय’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते नचिकेत देवस्थळी यांचा भारदस्त आवाज ‘सायको किलर’ला लाभलाय. या सिरीजमध्ये पत्रकार, पोलीस इन्स्पेक्टर, गुन्हेगार, मनोविकारतज्ज्ञ अशी वेगवेगळी पात्रं असली तरी नचिकेतनं आपल्या दमदार आवाजानं आणि उत्तम व्हॉईस मॉड्युलेशननं ही सगळी पात्र अक्षरशः जिवंत केली आहेत. त्यामुळं नचिकेत देवस्थळी यांच्या भारदस्त आवाजात ‘सायको किलर’मधला थरार अनुभवणं श्रोत्यांसाठी खरंच मेजवानी ठरतेय.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content