Homeएनसर्कलललित गांधी सलग...

ललित गांधी सलग तिसऱ्यांदा ‘फिक्की’च्या संचालकपदी!

देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व ‘फिक्की’ या नावाने ओळखली जात असलेल्या नवी दिल्लीच्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज’च्या कार्यकारी समिती संचालकपदांच्या निवडणुकीत ललित गांधी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत ललित गांधी विक्रमी मतांनी निवडून आले. निवडीचा कालावधी तीन वर्षांसाठीचा आहे. फिक्कीचे महासंचालक अरुण चावला यांनी त्यांना नुकतेच निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.

सध्या ललित गांधी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्री.’चे अध्यक्ष आहेत. दिल्ली येथे फिक्कीच्या 95व्या वार्षिक सभेप्रसंगी ही निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत गांधी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन बाजी मारली. त्यामुळे देशातील सर्वोच्च शिखर संस्थेत गांधी यांनी संचालकपदाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत या गटात उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेले ते एकमेव प्रतिनिधी आहेत.

देशातील विविध उद्योग व व्यापारी घटकांची राष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या ‘फिक्की’च्या औद्योगिक संस्था गटातून झालेल्या निवडणुकीत ललित गांधी यांनी हा विजय प्राप्त केला. यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून काम करताना अचूक माहिती उद्योग जगताला देत, सरकारबरोबर योग्य तो समन्वय करण्याचं महत्त्वाचं काम केले आहे. ‘फिक्की’सारख्या संस्था उद्योग आणि व्यापार क्षेत्रात, विशेषता शासकीय स्तरावर विविध धोरण ठरवण्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावितात. `फिक्की` या संस्थेवर सलग तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा मोठा सन्मान समजत असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.

देशाच्या अर्थविषयक आणि उद्योगविषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या ‘फिक्की’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम उद्योगांनासुद्धा अधिक बळ देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करू असेही ते म्हणाले.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content