“कोटक सिक्युरिटीज”ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत.
अदानी पोर्ट्स-
सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419
पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900
गुंतवणुकीवर परतावा (रिटर्न्स): 34%
ADSEZ द्वारे मूल्यवर्धनामुळे कंपनीला मजबूत गती मिळाली आहे. वर्षभरात ADSEZ च्या पोर्ट पोर्टफोलिओच्या दोन-तृतीयांश भागात मजबूत व्हॉल्यूम वाढ अपेक्षित आहे. पूर्व किनारपट्टीवरील बंदरे मजबूत वाढ आणि भांडवलीखर्च वाढीसाठी सज्ज आहेत. व्हॉल्यूमचा प्रमुख वाटा कंटेनर आणि वाढीच्या नव्या मार्गावरून येतो. आर्थिक वर्ष 2029मध्ये 11,400 कोटी रुपये टॉपलाइन आणि 2,800 कोटी रुपये नफ्याचा अंदाज आहे.
अकुटास केमिकल-
किंमत: ₹ 1,387
टार्गेट: ₹ 1,780
रिटर्न्स: 28%
फार्मा इंटरमीडिएट्स आणि स्पेशॅलिटी केमिकल्समधील वेगाने वाढणारी उत्पादक कंपनी आहे. प्रक्रियेतील सुधारणा आणि अनुकूल मिश्रणामुळे मार्जिनमध्ये मोठी वाढ होत आहे. सुधारित मार्जिनसह 25% महसूलवाढीची अपेक्षा आहे. या आर्थिक वर्षअखेर CDMO प्रकल्प सुरू होत आहेत. कंपनी सलग दुसऱ्या वर्षी मार्जिनमध्ये मजबूत विस्तार देण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. वाढीचा दृष्टीकोन मजबूत असून फार्मा, इलेक्ट्रोलाइट, सेमीकंडक्टर कारभारामध्ये चांगली झेप घेतलेली आहे.
आयसीआयसीआय बँक-
किंमत: ₹ 1,365
टार्गेट: ₹ 1,700
रिटर्न्स: 23%
बँकेचा इक्विटीवरील 18% परतावा हा उद्योगातील सर्वोत्तम आहे. त्यांच्या मालमत्ता गुणवत्तेच्या मेट्रिक्समध्ये असुरक्षित कर्ज पोर्टफोलिओमध्ये कोणताही ताण दिसून येत नाही. कर्जाची वाढ व्यापक आहे. भांडवली बाजाराशी संबंधित उपकंपन्यांसाठी आर्थिक वर्ष आणखी मजबूत राहिले होते.
महिंद्रा अँड महिंद्रा-
किंमत: ₹ 3,462
टार्गेट: ₹ 4,000
रिटर्न्स: 16%
महिंद्राने ऑटो सेक्टरच्या तिन्ही विभागांमध्ये आघाडीचे स्थान राखले आहे. ट्रॅक्टर विभागाच्या व्हॉल्यूम वाढीचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. या आर्थिक वर्षांत तरुणाईमध्ये SUV क्रेझ वाढण्याची अपेक्षा आहे. LCV वाहनांना मागणी वाढेल. LCV आणि ट्रॅक्टर विक्रीतून नफा वाढण्याची अपेक्षा आहे.
इटरनल (झोमॅटो)-
सध्याची किंमत: ₹ 328
दिवाळी 2026 टार्गेट: ₹ 375
रिटर्न्स: 15%
देशातील खाद्यान्न वितरण क्षेत्रात, कंपनीचा एकूण वाटा 57% आहे..आर्थिक वर्ष 2025मध्ये प्रतिस्पर्धी स्विगीचा वाटा 43% होता. झोमॅटोची 750 शहरांमध्ये विस्तृत भौगोलिक उपस्थिती आहे, तर स्विगी 660 शहरांमध्ये आहे. झोमॅटोच्या क्विक कॉमर्स डार्क स्टोअर (दहा मिनिटात डिलिव्हरी) ब्लिंकिटच्या टेक रेटमध्ये विस्तारासाठी अजून भरपूर स्कोप आहे. जुन्या स्टोअर्सच्या उच्च प्रमाणामुळे ऑपरेटिंग लीव्हरेज वाढेल. ब्लिंकिटला आर्थिक वर्ष 2026च्या दुसऱ्या सहामाहीत नफ्याचा ब्रेकइव्हन गाठण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज-
किंमत: ₹ 1,363
टार्गेट: ₹ 1,555
रिटर्न्स: 14%
टेलिकॉम शाखा जिओ पुढल्या वर्षी IPO लाँच करेल. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष 2027 अखेरपर्यंत दुप्पट होईल. पुढील तीन वर्षांत संघटित किरकोळ विक्री 20%पेक्षा जास्त महसूल देईल, अशी अपेक्षा आहे, तर FMCG व्यवसायातून पुढील पाच वर्षांत ₹ 1 लाख कोटी महसूलाचे उद्दिष्ट आहे. सध्या तो ₹ 11,500 कोटी आहे. दीर्घकाळात, रिलायन्स जागतिक स्तरावर पाऊल ठेवणारी भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनण्याची आकांक्षा बाळगते. शिवाय, एका डीप-टेक एंटरप्राइझमध्ये रूपांतरित होण्यावर लक्ष केंद्रित करून, RIL ने Meta सोबत एक नवीन संयुक्त उपक्रम जाहीर केला आहे. Google Cloud सोबतही आपली भागीदारी वाढवली आहे.
कमिन्स-
किंमत: ₹ 3,933
टार्गेट: ₹ 4,400
रिटर्न्स: 12%
कंपनीने आर्थिक वर्ष 2025मध्ये नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे आणि नवीन ऑफरिंग्ज वाढवल्या आहेत. कालांतराने कमिन्सला त्याचा वितरण व्यवसाय वाढवण्यासाठी अर्थपूर्ण संधी आहे. पॉवरजेनमधील विक्री मजबूत वाढीच्या मार्गावर आहे.
डिस्क्लेमर: किरण हेगडे लाईव्ह (KHL)वर दिले जाणारे गुंतवणूक सल्ले हे त्या क्षेत्रातील तज्ञ/ब्रोकिंग हाऊसेस/रेटिंग एजन्सींच्या रिपोर्ट्स आधारे दिले जातात. हे त्या तज्ञ आणि मार्केट संस्थांचे संशोधन अन् अंदाज यावर आधारित गुंतवणूक टिप्स आहेत. KHL किंवा तिच्या व्यवस्थापनाचे हे अंदाज नाहीत. आम्ही फक्त सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. इक्विटीमध्ये गुंतवणुकीत आर्थिक जोखीम असते, म्हणून गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना किंवा ट्रेडिंग करताना योग्य ती काळजी घ्यावी. या बातमीच्या आधारे केलेल्या व्यवहारातून झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी KHL किंवा लेखक जबाबदार नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.