Homeचिट चॅटमहाराष्ट्र ज्युनियर कॅरमः...

महाराष्ट्र ज्युनियर कॅरमः कौस्तुभ, दीक्षा, सार्थक, केशर विजेते 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झालेल्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या कौस्तुभ जागुष्टेने पुण्याच्या आयुष गरुडचा १६-१३, १७-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून १८ वर्षांखालील मुलांचे विजेतेपद पटकाविले. १८ वर्षांखालील मुलींमध्ये सिंधुदूर्गची दीक्षा चव्हाण अंतिम विजयी ठरली. तिने मधुरा देवळेवर चुरशीच्या लढतीत १३-९, ७-१९ व १६-१ अशी मात केली.

युथ २१ वर्षांखालील मुलांमध्ये अंतिम फेरीत मुंबईच्या सार्थक नागावकरने मुंबईच्याच शेख फैझान अब्दुल रहमानवर तीन सेटमध्ये १०-७, ७-१७ व १७-४ असा विजय मिळविला. मुलींच्या युथ २१ वर्षांखालील गटात  सिंधुदूर्गच्या केशर निर्गुणने विजेतेपद मिळविताना ठाण्याच्या सखी दातारविरुद्ध १८-४ असा पहिला सेट जिंकला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये ६ बोर्डनंतर दोनही खेळाडूंचे ८-८ असे समान गुण झाल्याने सामना टायब्रेकरवर गेला आणि त्यात सखीने ३-२ अशी बाजी मारत सामन्यात रंगत आणली. परंतु तिसरा सेट १३-४ असा सहज जिंकून केशरने बाजी जिंकली.

विजेत्या खेळाडूंना कॅरममधील विश्वविजेते योगेश परदेशी, राष्ट्रीय कॅरम विजेते संजय मांडे, संदीप देवरुखकर आणि योगेश धोंगडे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादरचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत पेडणेकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कार्यकारिणी सदस्य संतोष चव्हाण उपस्थित होते.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content