Homeएनसर्कल'ज्‍युलिओ'ने उभारला २.५...

‘ज्‍युलिओ’ने उभारला २.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी

ज्‍युलिओ या अविवाहितांसाठी विश्‍वसनीय, विशेष क्‍लबने भारतातील ऑनलाईन डेटिंग आणि मॅचमेकिंग संदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी १८०हून अधिक प्रख्‍यात गुंतवणूकदारांकडून एंजल फंडिंगमध्‍ये २.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारल्‍याची घोषणा केली आहे. एंजल्‍सच्‍या प्रतिष्ठित यादीमध्‍ये लिव्‍हस्‍पेसचे संस्‍थापक रमाकांत शर्मा, क्रेडचे संस्‍थापक कुणाल शाह, अॅकोच्‍या सहसंस्‍थापक रूची दीपक, जेपी मार्गन इंडियाचे माजी अध्‍यक्ष लिओ पुरी आणि ग्रोचे संस्‍थापक हर्ष जैन व ललित केश्रे यांचा यात समावेश आहे.

चिरंजीव घई आणि वरूण सूद यांनी २०२३मध्‍ये स्‍थापन केलेली ज्‍युलिओ, पारंपरिक भारतीय मॅचमेकरच्‍या कार्यपद्धतीमधून प्रेरित आहे आणि अस्‍सल, वास्‍तविक जीवनातील भेटींना चालना देत आधुनिक डेटिंग आणि मॅट्रिमोनीसाठी (विवाह) अधिक जबाबदार व उत्तम दृष्टिकोन देते.

ज्‍युलिओचे संस्‍थापकीय मुख्‍य कार्यकारी अधिकारी वरूण सूद म्‍हणाले की, मला जगभरातील वापरकर्त्‍यांसाठी ज्‍युलिओ सादर करण्‍याचा आनंद होत आहे. डेटिंग अॅपची कमतरता आणि मानसिक आरोग्‍यासंबंधित समस्‍यांचा आज दुर्दैवाने जगभरातील अविवाहितांवर परिणाम होत आहे. आमचा अविवाहितांसाठी विश्‍वसनीय क्‍लब निर्माण करण्‍याचा मानस आहे, जो त्‍यांना खऱ्या प्रेमाचा शोध घेण्‍यासाठी सुरक्षित, विश्‍वसनीय आणि जबाबदार सेवा देईल.

मी एंजल्‍स म्‍हणून संपूर्ण पाठिंबा देण्‍यासाठी माझ्या प्रतिष्ठित मित्रांचे व कुटुंबाचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो. त्‍यांचा सल्‍ला व नेटवर्क्‍स, तसेच अत्‍यंत स्‍मार्ट, उत्‍कट व सर्वोत्तम कर्मचाऱ्यांची आमची दर्जेदार टीम आम्‍हाला मोठ्या प्रमाणात एआय व इंडिया स्‍टॅकसह आधुनिक मॅचमेकिंग लँडस्‍केपमध्‍ये क्रांती घडवून आणण्‍यास मदत करेल. जसे व्हिडिओजसाठी यूट्यूब आणि शोध घेण्‍यासाठी गुगल आहे तसे आम्‍ही जागतिक स्‍तरावर डेटिंग/मॅचमेकिंगसाठी विश्‍वासार्ह सेवा बनलो तर ते चांगले काम मानू, असेही ते म्हणाले.

लिव्‍हस्‍पेसचे संस्‍थापक रमाकांत शर्मा म्‍हणाले की, अविश्‍वसनीयरित्‍या उत्तम व प्रतिभावान व्‍यावसायिकांच्‍या टीमद्वारे संचालित ज्‍युलिओ, आजच्‍या काळातील गुंतागुंतीच्‍या ग्राहक इंटरनेट समस्‍यांचे निराकरण करण्‍याच्‍या मिशनवर आहे. मला त्‍यांच्‍या प्रवासाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे, तसेच मी त्‍यांना सर्वतोपरी पाठिंबा देण्‍यास उत्‍सुक आहे.

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content