Homeचिट चॅटमुंबईत साजरा झाला...

मुंबईत साजरा झाला जयस्वाल महोत्सव

जयस्वाल समाजाच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय जायसवाल कमिटीने मुंबईत दोन दिवसीय जयस्वाल महोत्सवाचं नुकतंच आयोजन केलं होतं. या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जयस्वाल समजाचे असंख्य लोक एकत्र आले होते. यावेळी रोजगार मेळावे, वैद्यकीय शिबिरे, करिअर समुपदेशन, गुंतवणदारांसाठी जागरूकता कार्यक्रम, प्रेरक भाषणे, महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आणि नृत्य सादरीकरण, विनोदी कविता वाचन आणि पतंग महोत्सव यासारखे विशेष कार्यक्रम मालाड चारकोप नाका येथील सरस्वती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १३ आणि १४ जानेवारी असे दोन दिवस आयोजित करण्यात आले होते.

सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी राजदीपकुमार गुप्ता म्हणाले की, या कार्यक्रमाची रचना एका अनोख्या पद्धतीने करण्यात आली, ज्यामध्ये मनोरंजनासह नवोदित प्रतिभा आणि रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना रोजगार प्राप्तीसाठी व्यासपीठ मिळेल.

अखिल मुंबई जयस्वाल सभा, श्री विंध्यवासिनी सेवा मंडळ, जयस्वाल सेवा संस्था, जयस्वाल समाज संस्था, कलवार समाज संघ, जयस्वाल समाज सेवा संस्था, जयस्वाल फाऊंडेशन आणि जयस्वाल परिवार फाउंडेशन यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.

संपूर्ण जयस्वाल समाजाला एकत्र आणणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिला, पुरुष आणि मुलांसाठी सामाजिक जागृती मोहिमेपासून आरोग्य शिबिरे, शैक्षणिक ते आर्थिक कार्यक्रम आणि तरुणांसाठी रोजगार मेळावे ते महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळांचे आयोजन या कार्यक्रमांतून करण्यात आले, असे सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी संदिप गुप्ता म्हणाले.

सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत गुप्ता आणि संचालक मंडळ, रूट मोबाईल यांच्या नेतृत्त्वाखाली हा महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी संतोषानंद देवजी महाराज उपस्थित होते. जयस्वाल महोत्सवात समाजातील प्रत्येक वयोगटासाठी फायदेशीर असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत हे समाजाच्या दृषटीने अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे, असे स्वामी संतोषानंद म्हणाले.

जयस्वाल युथ फेडरेशनचे अध्यक्ष विश्वनाथ कलवार म्हणाले की, जयस्वाल समाजात एकोपा पसरवण्यासाठी ओळखला जातो. समाजाला मदत करणे आणि एकमेकांमधील आदर वाढवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

अंतिम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पाहुणे, व्यावसायिक, उद्योजक आणि उद्योगपतींचा सत्कार करण्यात आला आणि ‘संगीत संध्या’ने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये रमा देवी- लोकसभा प्रोटोकॉल स्पीकर, श्रीपाद नाईक- पर्यटन आणि बंदरे राज्यमंत्री, संजय जैस्वाल- लोकसभा खासदार आणि बिहार भाजपचे माजी अध्यक्ष, कृष्णा प्रसाद- IPS आणि ADGP फोर्स वन, महाराष्ट्र सरकार, सिद्धार्थ जैस्वाल- IRS जॉइंट कमिशनर कस्टम आणि एक्साईज मुंबई यांनीदेखील या महोत्सवाला उपस्थिती दर्शवली होती.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content