इतिहासात प्रथमच, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (TISS) जैन आध्यात्मिक साधू, तीर्थंकर श्री महावीर यांचे 79वे उत्तराधिकारी, जैनाचार्य युगभूषणसुरी, यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ‘सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील भेदभावाचे मूळ कारण’ या विषयावरील परिषदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले.
‘सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील भेदभावाचे मूळ कारण’, या विषयावरील परिषदेत जैनाचार्य म्हणाले की, भेदभावाची पद्धतशीरपण खोलवर रुजलेली कारणे पाश्चात्य शक्तींनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापित केलेल्या जागतिक व्यवस्थेत अंतर्भूत आहेत. अशा जागतिक व्यवस्थेचे कारण वर्णद्वेषात रुजले आहे. गरिबी हा अपघात नाही तर ती कृत्रिम आहे. हे तयार करण्यात आलेले दारिद्र्य आणि परिणाम अविकसित राष्ट्रांतल्या भेदभावाचे प्रमुख कारण आहे. वसुधैव कुटुंबकमच्या तत्त्वज्ञानावर आधारित सुधारणा हाच त्यावरील उपाय आहे.
परिसंवादासोबतच आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक समस्यांवरील प्राचीन धर्मग्रंथांमधून काढलेले निष्कर्ष प्रदर्षित केले गेले. प्राचीन भारत आणि आधुनिक भारतातल्या मूलभूत सिद्धांताची उदाहरणात्मक तुलना या प्रदर्शनात करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले 200हून अधिक मान्यवर उपस्थित होते. त्यात हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, रिलायन्सचे कार्यकारी संचालक दिलीप देराई, प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. भास्कर शाह, फॉर्म इझीचे सहसंस्थापक धवल शाह आणि हार्दिक शाह, आयआयटी बॉम्बेच्या प्रा. अहोना रॉय आणि सिडनॅहम महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. कौशल जैन आदींचा समावेश होता.