Homeमाय व्हॉईसइराण आणि इस्त्राईल...

इराण आणि इस्त्राईल यांच्यात होती तब्बल 30 वर्षे पक्की दोस्ती! 

तुम्हाला कदाचित हे वाचून धक्का बसेल; पण हाच इतिहास आहे. 1948 ते 1979 या काळात इराण आणि इस्त्राईलमध्ये अतिशय चांगले संबंध होते, कारण दोघांनाही अरब देशांचा धोका वाटायचा. विशेषतः इराक आणि अरब राष्ट्रांची ‘पॅन-अरॅब’ एकजूट. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, आयातोल्ला खोमैनी सत्तेत आला आणि इस्त्राईलला “इस्लामचा शत्रू” म्हणून घोषित केलं गेलं. त्यानंतर इराणने इस्त्राईलशी सर्व संबंध तोडले. हिजबुल्ला, हमास वैगेरे इस्त्राईलविरोधी गटांना मदत द्यायला सुरुवात केली. तेव्हापासूनच ही वादाची ठिणगी पेटतेय ती आजपर्यंत.

इराणचा सम्राट शाह- शहेनशाह, आर्यमेहेर

1941 ते 1979 या काळात इराणचा शेवटचा सम्राट होता- मोहम्मद रझा शाह पहलवी. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान वैगेरे कुणी नव्हते, तर थेट राजा! त्याला “Shahanshah” (किंग ऑफ किंग्स), “Aryamehr” (Light of the Aryans) असेही म्हटले जायचे. शाहचे वडील रझा शाह पहलवी हे 1925-1941 या काळात इराणचे पहिले पहलवी सम्राट होते. तेव्हा इराण मुस्लिम देश असला तरी, तो ख्रिस्तीद्वेष्टा नव्हता. शाहच्या काळात तो एक प्रगत, पाश्चिमात्य-समर्थक आणि धर्मनिरपेक्ष देश होता.

तेहरानमध्ये ज्यू एजन्सीचं ऑफिस

मोहम्मद रझा शाह पहलवी यांच्या काळातच इराण-इस्त्राईल संबंध अत्यंत जवळचे, मैत्रीपूर्ण आणि गुप्त होते. त्याने इस्त्राईलशी व्यापार, संरक्षण, गुप्तचर, तंत्रज्ञान, कृषी अशा अनेक क्षेत्रात मैत्री वाढवली. अरब देशांनी इस्त्राईलला शत्रू मानलं आणि इराणच्या शियापंथीय सरकारलासुद्धा धोका वाटायचा म्हणून दोघांनी एकमेकांना गुप्त मदत केली. इराणमध्ये मोठी ज्यू कम्युनिटी होती आणि तेहरानमध्ये ज्यू एजन्सीचं ऑफिसही होतं. दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या भूमीत गुप्त/अर्ध-गुप्त दौरे केले; पाहुणचार, सन्मान, आणि मैत्रीपूर्ण चर्चा व्हायच्या. इस्त्राईलचे पहिले पंतप्रधान Ben-Gurion यांनी गुप्तपणे इराणमध्ये भेट दिली होती. मोसाद प्रमुख, IDF कमांडर्सही इराणला जायचे. दोन्ही देशांनी मिळून इराकविरुद्ध कूर्द बंडखोरांना मदत केली आणि Project Flower मिसाईल प्रकल्प केला.

कम्युनिझमविरोधी आघाडी

शाह मोहम्मद रझा पहलवी आणि इस्त्राईलचे नेते (Golda Meir, Yitzhak Rabin) यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांनी एकमेकांच्या देशात भेटी दिल्या. शाहच्या काळात इराणने इस्त्राईलला मोठ्या प्रमाणावर तेल पुरवलं आणि दोन्ही देशांनी मिळून इराकविरुद्ध गुप्त ऑपरेशन्स चालवल्या. Golda Meir आणि शाहची 1972मध्ये भेट झाली. त्यांनी “आम्ही कम्युनिझमविरोधी आघाडी आहोत” असं जाहीर केलं. 1974मध्ये Yitzhak Rabin इराणमध्ये आले आणि इराणच्या गुप्तचर प्रमुखाशी भेटले. 1959मध्ये शाहने इस्त्राईलला Implicit Recognition दिली. तेहरानमध्ये इस्त्राईल ट्रेड ऑफिस (de facto embassy) उघडलं.

पॅरिस, स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण

शाह अत्यंत पाश्चिमात्य-समर्थक होते. त्यांनी पॅरिस, स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांना लक्झरी कार, घोडेस्वारी, शिकार याचा छंद होता. त्यांच्या कारकिर्दीत इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य, आणि स्त्री-स्वातंत्र्य वाढलं. शाहच्या काळात इराणमध्ये मोठ्या पार्टीज, राजेशाही समारंभ आणि जगभरातील सेलिब्रिटी, नेते येत असत. त्यात इस्त्राईलचे नेतेही सामील होत.

पार्टीज, लक्झरी लाइफस्टाइल

शाह मोहम्मद रझा पहलवी यांची पत्नी फराह दिबा (Farah Diba) ही इराणची शेवटची सम्राज्ञी होती. ती आर्ट, शिक्षण, आणि स्त्री-हक्कांसाठी प्रसिद्ध होती. शाहला तीन बायका होत्या. पण फराह दिबा सर्वात प्रसिद्ध. त्यांना चार मुले- Reza Pahlavi (वारसदार), Ali Reza, Leila, आणि Farahnaz. शाहच्या काळात राजघराणं जगभर फिरायचं- पॅरिस, लंडन, वॉशिंग्टनमध्ये पार्टीज, भेटी, आणि लक्झरी लाइफस्टाइल प्रसिद्ध होती.

मैत्री शत्रुत्वात बदलली!

1979मध्ये “इस्लामिक क्रांती” झाली. इराणचा शाह पळून गेला. आयातोल्ला खोमैनी सत्तेत आला. पाश्चिमात्य-समर्थक, धर्मनिरपेक्ष राजेशाहीचं इस्लामिक सरकारमध्ये रूपांतर झालं आणि इराण एक कट्टर इस्लामिक रिपब्लिक बनला. या क्रांतीपूर्वीही इराणने इस्त्राईलला कधीच पूर्णपणे मान्यता दिली नव्हती, पण व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि तेल या सगळ्या क्षेत्रात मैत्री होती. हे सगळं बदलून गेलं जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. तेव्हापासून मैत्री शत्रुत्वात बदलली!

शाह फॅमिली सध्या कुठे राहते?

शाहची पत्नी फराह पहलवी आणि मुले (Reza Pahlavi, Farahnaz, Ali Reza, Leila) आजही पॅरिस, अमेरिका आणि युरोपमध्ये राहतात. Reza Pahlavi हा इराणचा वारसदार समजला जातो. तो लोकशाही आणि मानवाधिकारांसाठी काम करतो. फराह पहलवी इराणच्या संस्कृती, आर्ट आणि इराणी निर्वासितांसाठी काम करत राहिली. त्यांच्या मुलांपैकी Leila आणि Ali Reza यांचे निधन झाले. Reza Pahlavi सध्या अमेरिकेत राहतो. तो इराणमध्ये लोकशाही, मानवी हक्क आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम चालवतो. त्याने राजकारणात सक्रिय राहून इराणी जनता आणि निर्वासितांसाठी अनेक भाषणं, मुलाखती दिल्या आहेत. फराह पहलवी पॅरिसमध्ये राहते. ती इराणी आर्ट, सांस्कृतिक वारसा आणि निर्वासितांच्या मदतीसाठी काम करते. ती अजूनही इराणच्या जुन्या आठवणी आणि शाहच्या काळातील अनुभव शेअर करते.

इराणच्या शाहचे काय झाले?

इराणचा शाह मोहम्मद रझा पहलवी 1979मध्ये इस्लामी क्रांतीनंतर पळून गेला. तो आधी मोरोक्को, बहामा, मेक्सिको, अमेरिका, पनामा अशा अनेक देशांत राहिला आणि शेवटी इजिप्तमध्ये आश्रय घेतला. 27 जुलै 1980 रोजी इजिप्तमधल्या काहिरा शहरात कॅन्सरमुळे त्याचं निधन झालं. त्याच्या मृत्यूनंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांनी त्याच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. शाह यांनीच इराणमध्ये औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक सुधारणा (श्वेत क्रांती) सुरू केल्या. त्यांच्या काळात इराण समाज पश्चिमीकरणाकडे झुकला. पण यामुळे धार्मिक नेत्यांचा आणि सामान्य जनतेचा विरोध वाढला.

इस्लामी इराणचा अध्याय…

1979मधील इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये धर्मगुरूंना सर्वोच्च सत्ता मिळाली आणि देशाची कायदा-व्यवस्था, समाज आणि परराष्ट्र धोरण पूर्णपणे बदलले. अयातुल्ला खोमेनी सर्वोच्च नेता झाले आणि इराणमध्ये शरिया कायदा लागू करण्यात आला. राजकीय विरोधक, महिलांचे अधिकार आणि माध्यमस्वातंत्र्य यावर कडक निर्बंध आले. देशात धार्मिक नेत्यांचे वर्चस्व वाढले आणि इराण एक कट्टरपंथी इस्लामिक राज्य बनले. इराणचे अमेरिकेशी संबंध ताणले गेले. अमेरिकन दूतावासातील बंदी प्रकरण इतिहासात गाजले आहे.

सध्या इराणची काय स्थिती?

सध्या इराणमध्ये आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक असंतोष खूप वाढला आहे. राजकीयदृष्ट्या, इस्लामी राजवटीमुळे लोकशाही, महिला हक्क आणि व्यक्तिस्वातंत्र्यांवर कडक मर्यादा आहेत. आजच्या तुलनेत, शाहच्या काळात इराणची अर्थव्यवस्था आणि महिलांचा दर्जा जास्त चांगला होता. महिलांना मतदानाचा आणि निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार शाहच्याच काळात मिळाला. औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती वेगाने होत होती. श्वेत क्रांतीमुळे महिलांना अधिकार, शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळाली होती. पण, लोकशाही आणि मानवी हक्कांच्या बाबतीत दोन्ही काळात वेगवेगळ्या समस्या राहिल्या. त्या इतक्यात संपतील असे वाटत नाही.

Continue reading

या आहेत पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी!

जगभरातील पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी: 1. भारतातल्या मेघालयमधील मॉसिनराम हे गाव जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. इथे दरवर्षी सुमारे 11,971 मिमी पाऊस पडतो! 2. केरळमध्ये 2001 साली लाल रंगाचा पाऊस पडला होता. हा पाऊस Trentepohlia नावाच्या शैवालाच्या कणांमुळे...

गेल्या शैक्षणिक वर्षात मिश्र राहिला प्लेसमेंट ट्रेण्ड!

2024-25 मध्ये प्लेसमेंट ट्रेण्ड मिश्र राहिला. टॉप आयआयटी, आयआयएममध्ये सुरुवात जोरदार झाली; पण नंतर थोडी मंदावली. काही ठिकाणी फक्त 70% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली.  सर्वाधिक प्लेसमेंट देणारे टॉप टेन कोर्सेस: 1. Computer Science/IT 2. Electronics & Communication 3. Mechanical 4. Electrical 5. Civil 6. Data Science/AI 7. MBA...

भारतातल्या एकमेव ज्वालामुखीच्या बेटावर राहतात फक्त बकऱ्या, उंदीर आणि पक्षी!

सध्या इंडोनेशियात लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींचा "हॉटस्पॉट" बनला आहे, ज्यात अनेक सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखी आहेत. जगातील आकाराने किंवा सक्रियतेने जे सर्वात मोठे...
Skip to content