Homeन्यूज ॲट अ ग्लांसभारताची ऐतिहासिक झेप.....

भारताची ऐतिहासिक झेप.. टिपले सौरज्वाळांचे दृश्य!

भारताची पहिली समर्पित सौर अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल 1वरील ‘एसयूआयटी’, या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याच्या प्रभावळीतील फोटोस्फीअर आणि क्रोमोस्फीअर या वातावरणात ‘कर्नेल’, म्हणजेच शक्तिशाली सौरज्वाळांचे अभूतपूर्व दृश्य टिपले आहे. सौर भौतिकशास्त्रातील भारताची ही ऐतिहासिक झेप आहे.

एसयूआयटीने 22 फेब्रुवारी 2024 रोजी एक्स 6.3-क्लासची सौर ज्वाला टिपली होती, ज्याची अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबी श्रेणी 200-400 एनएम इतकी होती. सूर्याचा संपूर्ण पृष्ठभाग संपूर्ण तरंगलांबीच्या श्रेणीत एवढ्या बारीक तपशिलांसह प्रथमच चित्रित करण्यात आला आहे. ही निरीक्षणे सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटक घडामोडी आणि सूर्याच्या वातावरणातील विविध थरांमध्ये ऊर्जा हस्तांतरण नियंत्रित करणाऱ्या जटील प्रक्रियांबद्दलचा नवा दृष्टीकोन देतात.

चुंबकीय ऊर्जा अचानक मुक्त झाल्यामुळे निर्माण होणार्‍या सौर ज्वालांचा अनेकप्रकारे परिणाम होऊ शकतो. उपग्रह परिचालन, रेडिओ दळणवळण आणि पॉवर ग्रिडवर परिणाम होऊ शकतो तसेच अंतराळवीर आणि विमान प्रवाशांसाठी ते धोकादायक ठरू शकते. इतिहासात एक शतकाहून अधिक काळ अशा घटनांची नोंद झाली आहे. परंतु समर्पित अंतराळ दुर्बिणींच्या कमतरतेमुळे एनयूव्ही बँडमधील डेटाची नोंद झाली नाही. एसयूआयटी उपकरण आता सूर्याच्या पृष्ठभागावरील घडामोडींबद्दल आपली समज वाढविणारी अशाप्रकारची पहिली निरीक्षणे देऊन ही मोठी पोकळी भरून काढत आहे.

एसयूआयटीच्या निरीक्षणांमधून झालेला मोठा खुलासा म्हणजे, सूर्याच्या पृष्ठभागावरील एकाच भागातील स्फोट. सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्माच्या तापमानवाढीशी त्याचा थेट संबंध आहे. हे निष्कर्ष फ्लेअर एनर्जी डिपॉझिशन आणि हीटिंगमधील थेट दुवा सांगतात, जे सौर भौतिकशास्त्रीय संशोधनाचे नवे मार्ग खुले करतात आणि दीर्घ काळापासून केल्या जाणाऱ्या सैद्धांतिक भाकितांची पडताळणी करतात.

आयुकाचे संचालक प्रा. श्रीआनंद, यांनी एसयूआयटीच्या योगदानाची ‘अभूतपूर्व’ अशा शब्दांत प्रशंसा केली असून, आदित्य-एल 1च्या महत्त्वाच्या निष्कर्षांची ही सुरुवात असल्याचे म्हटले आहे. एसयूआयटी आणि इतर उपकरणे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे, आदित्य-एल 1 सौर संशोधनात क्रांती घडवून आणेल आणि जागतिक अंतराळ विज्ञानात भारताला अव्वल स्थान मिळवून देईल. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील प्रा. दुर्गेश त्रिपाठी आणि प्रा. ए.एन.रामप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.ची विद्यार्थिनी सौम्या रॉय यांनी हे संशोधन केले असून, भारत आणि जर्मनीतील अग्रगण्य संस्थांचे यामध्ये योगदान आहे. हे निष्कर्ष द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झाले आहेत. हे यश प्रगत सौर निरीक्षणाच्या परिवर्तनशील क्षमतेवर प्रकाश टाकते, असे सौम्या रॉय म्हणाल्या. ही निरीक्षणे सूर्याची स्फोटक शक्ती बारीक तपशिलांसह उघड करतात, असे प्रा. दुर्गेश त्रिपाठी म्हणाले. हे प्रारंभिक निकाल नवीन उपकरणांची अफाट क्षमता दर्शवितात, जी यापुढेही असे अनेक शोध लावतील, असे प्रा. ए. एन. रामप्रकाश यांनी नमूद केले.

Continue reading

उद्यापासून सॅन होजे येथे रंगणार ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव!

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे...

शशांक केतकरच्या ‘मुरांबा’चे ११०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची...

‘सावली’वर सावली.. तीही कडक ऊन नसताना!

राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला 'सावली' हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून...
Skip to content