Homeबॅक पेजयुनेस्कोच्या जागतिक वारसा...

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची 40 स्थळे!

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राष्ट्रीय संरक्षण धोरण, 2014 नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकारक्षेत्रात 3696 केंद्रीय संरक्षित स्मारके/ स्थळे आहेत. आवश्यकतेनुसार आणि संसाधनांच्या उपलब्धतेनुसार स्मारकांचे /स्थळांचे संवर्धन केले जाते.सध्या, भारतामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमधील 40 स्थळे आहेत आणि युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत 52 स्थळे (वर्ष 2022 मध्ये जोडण्यात आलेल्या 6 स्थळांसह) आहेत.

तात्पुरत्या यादीत कोणत्याही स्थळाचा समावेश असणे ही पुढील जागतिक वारसा यादीतील समावेशासाठीची एक पूर्वअट आहे. तात्पुरती यादी वाढवणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. युनेस्को कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे, 2021 नुसार, वार्षिक शिलालेख प्रक्रियेसाठी केवळ एकच सांस्कृतिक किंवा नैसर्गिक स्थळ नामांकित केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, कोणत्याही स्थळाचा समावेश करायचा असेल तर निकषांची पूर्तता करणे, सत्यता आणि अखंडतेची अट पूर्ण करणे आणि उत्कृष्ट वैश्विक मूल्याचे औचित्य सादर करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्येकडील राज्यांचा विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत हे उत्तर दिले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content