Homeबॅक पेजभारत करणार एमक्यू-9बी...

भारत करणार एमक्यू-9बी ड्रोनची खरेदी!

संरक्षण अधिग्रहण परिषदेने 15 जून 2023 रोजी तिन्ही सेवा दलांसाठी अमेरिकेतून फॉरेन मिलिटरी सेलच्या माध्यमातून दुरून नियंत्रित करता येतील अशा 31 एमक्यू-9बी (16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन) हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स (HALE) रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टम (एचएएलई) खरेदीला आवश्यक मंजुरी दिली आहे. या आवश्यक मंजुरीमध्ये (AoN) संबंधित उपकरणांसह खरेदी केल्या जाणाऱ्या मानवरहित विमानांची संख्या समाविष्ट आहे.

आवश्यक मंजुरीपत्रात अमेरिकी सरकारने सांगितलेल्या 3,072 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स अंदाजे खर्चाची नोंद आहे. मात्र अमेरिकेच्या सरकारची धोरणात्मक मान्यता मिळाल्यानंतर किंमतीबाबत वाटाघाटी केल्या जातील. संरक्षण मंत्रालय इतर देशांना जनरल ऍटॉमिक्सद्वारे सांगण्यात आलेल्या सर्वोत्तम किंमतीशी या खरेदीसंबंधी खर्चाची तुलना करेल. खरेदीप्रक्रिया प्रगतीपथावर असून निर्धारित प्रक्रियेनुसार पूर्ण केली जाईल.

फॉरेन मिलिट्री सेल्स मार्गांतर्गत, अमेरिकेच्या सरकारला विनंतीपत्र पाठवले जाईल, ज्यात तिन्ही सेवादलांच्या गरजा, उपकरणांचे तपशील आणि खरेदीच्या अटी यांचा समावेश असेल. विनंतीपत्राच्या आधारे अमेरिका सरकार आणि संरक्षण मंत्रालय लेटर ऑफ ऑफर अँड एक्‍सेप्टन्सला अंतिम स्वरूप देईल, ज्यात उपकरणे आणि खरेदीच्या अटींची माहिती फॉरेन मिलिट्री सेल्स कार्यक्रम आणि अमेरिका सरकारने सांगितलेली किंमत आणि अटींनुसार तसेच इतर देशांना जनरल ऍटॉमिक्सद्वारे सांगण्यात आलेल्या सर्वोत्तम किंमतीनुसार वाटाघाटी करून अंतिम स्वरूप दिले जाईल. खरेदीची किंमत आणि इतर अटी व शर्ती अजून निश्चित व्हायच्या आहेत आणि वाटाघाटींच्या अधीन आहेत, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content