Monday, February 24, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटकझाकस्तान आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र...

कझाकस्तान आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत चमकला!

कझकस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय विद्यार्थी चमूने एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

वेदांत सक्रे (सुवर्ण) मुंबई, महाराष्ट्र, इशान पेडणेकर (रौप्य) रत्नागिरी, महाराष्ट्र, श्रीजीथ शिवकुमार (रौप्य) चेन्नई, तामिळनाडू, यशश्वी कुमार (रौप्य) बरेली, उत्तर प्रदेश या विद्यार्थ्यांनी भारतीय चमूची कामगिरी उंचावली.

35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन 7 जुलै ते 13 जुलै 2024 या कालावधीत कझाकस्तानमधील अस्ताना येथे करण्यात आले होते. या विद्यार्थी चमूचे नेतृत्त्व मुंबईतील टीडीएम प्रयोगशाळेतील  प्रा. शशिकुमार मेनन आणि टाटा मूलभूत शिक्षण संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या डॉ. मयुरी रेगे या नामवंत तज्ज्ञांनी तसेच आयआयटी बॉम्बेचे डॉ. राजेश पाटकर आणि बडोद्याच्या एम. एस. विद्यापीठाचे डॉ. देवेश सुथर या दोन वैज्ञानिक निरीक्षकांनी केले होते.

या वर्षीच्या ऑलिम्पियाडमध्ये 80 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 305 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण 29 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. स्पर्धेमध्ये 1.5 तासांच्या चार प्रात्यक्षिक परीक्षा आणि 3.25 तासांच्या दोन लेखी परीक्षांचा समावेश होता. प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये प्राणी शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञानशास्त्र, आण्विक जीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जैवमाहितीशास्त्र यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये मेंढीच्या डोळ्यांचे विच्छेदन, प्लाझमिड शुद्धीकरण, प्रथिनांचे प्रमाण, संहत पीएच टायट्रेशन, पीसीए आणि अनुक्रम विश्लेषण यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. लेखी परीक्षेत वनस्पती जीवशास्त्र, पेशी जीवशास्त्र, आचारशास्त्र आणि जैववर्गीकरण यासारख्या क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनावर आधारित आव्हानात्मक प्रश्न विचारण्यात आले होते.

विज्ञान विभागात, खगोलशास्त्र (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), जीवशास्त्र, रसायनशास्त्र, कनिष्ठ विज्ञान आणि भौतिकशास्त्रातील ऑलिम्पियाड कार्यक्रम प्रत्येक विषयासाठी स्वतंत्रपणे पाच टप्प्यांची प्रक्रिया आहे. प्रत्येक विषयाचा पहिला टप्पा भारतीय भौतिकशास्त्र अध्यापक संघटनेद्वारे (आयएपीटी) इतर विषयांतील शिक्षक संघटनांच्या सहयोगातून आयोजित केला जातो. खगोलशास्त्र (वरिष्ठ स्तर), जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे उर्वरित टप्पे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे (एचबीसीएसई) आयोजित केले जातात. खगोलशास्त्राचे उर्वरित टप्पे (कनिष्ठ स्तर) नॅशनल सेंटर फॉर सायन्स म्युझियमद्वारे (एनसीएसएम) हाताळले जातात. कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाडचे सर्व टप्पे आयएपीटीद्वारे हाताळले जातात.

Continue reading

अनेक फेस्टिवल गाजवणारा ‘फॉलोअर’ २१ मार्चला चित्रपटगृहात

आजवर अनेक फिल्म फेस्टिवल आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेला 'फॉलोअर' हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. मराठी, कन्नडा आणि हिंदी या तिन्ही...

आता ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत छोट्या दुकानदारांना मिळणार मदतीचा हात

सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर असलेली किराणाप्रो ही भारतातील पहिली ओएनडीसी-संचालित क्विक कॉमर्स कंपनी बनली आहे. दक्षिणेतल्या या कंपनीकडे भारतातील आघाडीचा एआय-संचालित क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट वैगेरे वाढत्या ऑनलाईन क्विक कॉमर्स स्पर्धेत आता देशभरातील छोट्या...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी "तरुण" योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया...
Skip to content