Homeब्लॅक अँड व्हाईटAIBDच्या अध्यक्षपदी भारताची...

AIBDच्या अध्यक्षपदी भारताची सलग तिसऱ्यांदा निवड!

भारताने आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून घेतली असून, 2018 ते 21. 2021 ते 23 अशी दोन वेळा सलग भारताकडे ही जबाबदारी आहे. आणि आता सलग तिसऱ्यांदा AIBD या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षपदी भारताची निवड होणे, ही एक अभूतपूर्व घटना आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देतांना, माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितले की अशी घटना एआयबीडी संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. 50 वर्षे जुन्या असलेल्या ह्या संस्थेने पुन्हा भारताची अध्यक्षपदी निवड करणे, म्हणजे आशिया-प्रशांत क्षेत्र आणि संपूर्ण जगानेच भारतावर दाखवलेला हा विश्वास आहे. भारत या क्षेत्रात जगाला मार्ग दाखवू शकतो आणि प्रसारण क्षेत्राला एक नवे मूल्य मिळवून देऊ शकतो.

एआयबीडी या संस्थेची स्थापना यूनेस्कोच्या अंतर्गत, 1977 साली झाली असून ही एक विशेष प्रादेशिक आंतरसरकारी संस्था आहे. सध्या या संस्थेचे 44 देशांतील 92 सदस्य आहेत. ज्यात, 26 सरकारी सदस्य (देश) प्रतिनिधी असून ते 48 प्रसारण प्राधिकरणे आणि प्रसारण संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच 44 संलग्न संस्था 28 देशांचे आणि आशिया, प्रशांत क्षेत्र, युरोप, आफ्रिका, अरब देश आणि उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतात. भारत या संस्थेचा एक संस्थापक सदस्य असून, भारताची सार्वजनिक प्रसारण सेवा, प्रसार भारती, या संस्थेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करते.

आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थे (AIBD) ची 21 वी सर्वसाधारण परिषद आणि संबंधित सभा, 2023 (GC 2023) अध्यक्ष, आणि प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गौरव द्विवेदी, यांच्या अध्यक्षतेखाली 2 ते 4 ऑक्टोबर, 2023 दरम्यान मॉरिशसच्या पोर्तुसिटी इथे झाली. धोरण निर्मिती आणि संसाधन विकासाद्वारे आशिया-पॅसिफिक प्रदेशात एक गतिमान आणि एकसंध इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी पोषक वातावरण निर्मितीविषयी या परिषदेत महत्वाची चर्चा झाली. 

आंतरराष्ट्रीय प्रसारण संस्थेत असे प्रतिष्ठित पद भूषवण्याची सलग तिसऱ्यांदा मिळालेली संधी, केवळ भारत आणि प्रसार भारतीवरील आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दृढ विश्वासच दर्शवत नाही तर प्रसारणाच्या क्षेत्रात धोरणात्मकदृष्ट्या पुढील टप्पे गाठण्यासाठी भारताचा पायाही त्यातून घातला जात आहे.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content