Friday, March 14, 2025
Homeमाय व्हॉईसवझीरएक्स एक्स्चेंजकडून टोकनफायचा...

वझीरएक्स एक्स्चेंजकडून टोकनफायचा समावेश!

वझीरएक्स या अग्रगण्य क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजने टोकनफायला नुकतेच आपल्या सूचीत समावेश केले आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट क्रिप्टो आणि मालमत्ता टोकनायझेशन प्रक्रिया सुलभ करणे हे आहे.

वझीरएक्सचे उपाध्यक्ष विपणन राजगोपाल मेनन यांनी सांगितले की वझीरएक्समध्ये टोकनफायचे स्वागत करत असतांनाच, आम्ही आमच्या क्रिप्टो कुटुंबाचा विस्तार करत आहोत. आम्ही साधेपणा, सुरक्षितता आणि न संपणाऱ्या संधींसाठी वचनबद्ध आहोत. टोकनफायसाठी ठेवी आता लाईव्ह आहेत.

उद्योगाच्या मागणीला प्रतिसाद देत जागतिक टोकनायझेशन सिनचे नेतृत्व करणे हे टोकनफायचे उद्दिष्ट आहे. याद्वारे वापरकर्ते कोडिंग कौशल्याशिवाय क्रिप्टोकरन्सी तयार किंवा मालमत्ता टोकानाइझ करू शकतील. टोकनफाय विकेंद्रित लाँचपॅडद्वारे अखंड निधी उभारणीची सुविधा देखील देते आणि टोकन जारीकर्त्यांना अधिक चांगल्या लिक्विडिटीसाठी एक्सचेंज, व्हीसी आणि बाजार निर्मात्यांशी जोडण्याकरिता मदत करते. जागतिक मालमत्ता टोकनायझेशन बाजारपेठेवर वर्चस्व गाजवण्याच्या महत्वाकांक्षेसह, टोकनफाय २०३० पर्यंत अंदाजित 16 ट्रिलियन यूएस डॉलर उद्योगाशी सुसंगत होईल, ज्याला ब्लॅकरॉक द्वारे ‘बाजारांमधील पुढची उत्क्रांती’ म्हणून ओळखले जाईल. एक चेतनामय वापरकर्ता समुदाय तयार करणे हे टोकनफायच्या दैनंदिन उपक्रम-आधारित पुरस्कार प्रणालीचे उद्दिष्ट आहे.

वझीरएक्स वापरकर्त्यांना टोकनफायच्या भोवती असलेल्या गतिशील मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते, ज्यात एचटीके कार्यक्रम, शिका आणि कमवा मोहीम आणि सामाजिक माध्यमांवरील आकर्षक स्पर्धांचा समावेश आहे. या मोहिमांच्या तपशीलवार माहितीसाठी, कृपया वझीरएक्सच्या अधिकृत सामाजिक पृष्ठ आणि ब्लॉगला भेट द्या.

फ्लोकी आणि टोकनफायचे कार्यान्वन प्रमुख, बी (दा व्हायकिंग) म्हणाले की, क्रिप्टोसाठी आजवर घडलेल्या ट्रेंड्स पैकी टोकनायझेशन हा सर्वात मोठा आहे. आम्ही अनेक क्रिप्टो ट्रेंड बघितले आहेत, परंतु या ट्रेंड्सपैकी कोणताही ट्रेंड टोकनायझेशन उद्योगाच्या वाढीच्या क्षमतेच्या जवळ आलेला नाही. त्यांचे रिटेल अनुकूल उपाय आणि वापरकर्त्याच्या अनुभवावर गंभीरपणे केंद्रित केलेले लक्ष याद्वारे टोकनफाय धोरणात्मकदृष्ट्या अग्रगण्य टोकनायझेशन व्यासपीठ म्हणून तयार होत आहे.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content