Homeबॅक पेजपंतप्रधान मोदीच करणार...

पंतप्रधान मोदीच करणार नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन!

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते. आणि उद्घाटनदेखील त्यांच्याच हस्ते होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.

आज उलवे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हेलिकॅप्टरद्वारे पाहणी करून विमानतळाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. प्रत्यक्ष पाहणीनंतर अदानी समुहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. खा. श्रीरंग बरणे, श्रीकांत शिंदे, आ. महेश  बालदी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, एमएआरडीएचे संचालक डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरू व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. सुरू असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल. 2024पर्यंत हे विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न असेल यादृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून ही एक चांगली भेट देणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 22 किलोमीटरचा सिलिंक महत्त्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. 5500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.4 किलोमिटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content