Saturday, March 29, 2025
Homeबॅक पेजअसे ओळखा तोतया...

असे ओळखा तोतया विमा एजंट!

विम्यातील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झालात, तर जेव्हा तुम्हाला विम्याची निकड असेल तेव्हा तुम्हाला त्याचे कव्हरेज मिळणार नाही. विमा फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इन्शुरन्सदेखो, या भारतातील आघाडीच्या इन्शुरटेक ब्रॅंडने लोकांना सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मदतरूप ठरू शकतील असे पाच मुख्य इशारे दिले आहेत.

जर तुम्हालाही भविष्यात तोतया विमा एजंटद्वारे देण्यात येणाऱ्या वाचायचे असेल तर हे लक्षात असू द्या..

१. ऑफर खूपच आकर्षक आहे याचा अर्थ ती बनावट असू शकते:

जर एखाद्या विम्याच्या प्लानमध्ये अवास्तव कमी प्रीमियममध्ये उच्च परताव्याची हमी असेल किंवा ‘खास’ सौदे असतील तर सतर्क व्हा. अस्सल पॉलिसी असतात त्यामध्ये जोखमी असतात आणि मानक शर्तीही असतात. जर एखादा प्लान खूपच छान वाटत असेल, तर तो खरा नसण्याचीच शक्यता असते.

2. फक्त रोख पेमेंट्सः

एक कायदेशीर विमा कंपनी कधीच रोख पेमेंट्सची किंवा व्यक्तिगत खात्यात पैसे स्थानांतरित करण्याची मागणी करत नाही. जे घोटाळेबाज असतात तेच स्वतःचा माग न ठेवण्यासाठी रोख किंवा अवैध पेमेंटपद्धती पसंत करतात. त्यामुळे पेमेंट्स थेट अधिकृत कंपनी खात्यात जातील याची नेहमी खातरजमा करा.

3. डिजिटल किंवा अधिकृत उपस्थिती नसणेः

संपूर्ण जग आता डिजिटल झाले आहे आणि अस्सल विमा व्यावसायिकांची ऑनलाइन उपस्थिती असतेच. जर एखाद्या एजंटचे लिंक्डइन प्रोफाइल नसेल, तो जर कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध नसेल किंवा विमा प्राधिकारणात त्याची नोंदणी झालेली नसेल तर सावध व्हा. पुढे जाण्यापूर्वी विमा कंपनीकडे त्याची ओळखपत्रे अवश्य पडताळून बघा.

विमा

4. अव्यावसायिक कम्युनिकेशनः

कायदेशीर एजंट कंपनीने त्यांना दिलेला ईमेल अॅड्रेस वापरतात. Gmail, Yahoo किंवा विचित्र दिसणारा ईमेल वापरणाऱ्या एजंट्सपासून सावध राहा. तसेच, घोटाळेबाज अधिकृत कम्युनिकेशन मार्गांऐवजी WhatsApp आणि सोशल मीडियावर विसंबून असतात. विमा प्रदात्याशी अधिकृत संपर्क तपाशीलांची पुष्टी अवश्य करा.

5. खूप दबाव आणून विक्री करण्याची रणनीतीः

घोटाळेबाज नेहमी घाईघाई करतात. खालीलप्रमाणे विधाने करून तुम्हाला झटपट कृती करण्यास भाग पडतात.

● “ही ऑफर आजच संपत आहे!”

● “हा खास दर लॉक करण्यासाठी आजच पेमेंट करा!”

● “तुम्ही तत्काळ कृती केली नाही, तर तुम्ही राहून जाल!”

जो एजंट नोंदणीकृत असेल, तो तुम्हाला पुनरावलोकन करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि एक माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वेळ देईल.

स्वतःचे संरक्षण कसे कराल?

● अधिकृत विमा नियामक संस्थेमार्फत त्या एजंटचा परवाना पडताळून बघा.

● त्या एजंटच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी विमा कंपनीशी थेट संपर्क साधा.

● रोख पेमेंट्स करण्याचे टाळा, फक्त अधिकृत कंपनी चॅनल्सचाच उपयोग करा.

● वैधतेसाठी ऑनलाइन रिव्ह्यू, सरकारी लिस्टिंग आणि सोशल मीडिया तपासून बघा.

● आपल्या सहज-प्रेरणेवर विश्वास ठेवा, काही गडबड वाटली तर कृती करण्याअगोदर तपास करा. सतर्क रहा, प्रश्न विचारा आणि नेहमी खरेदी करण्याअगोदर पडताळून बघा. तुमची आर्थिक सुरक्षा यावरच अवलंबून आहे.

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...
Skip to content