Homeब्लॅक अँड व्हाईटलडाखमध्ये सिंधू नदीवर...

लडाखमध्ये सिंधू नदीवर उभारला ह्यूम पाइप पूल

लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्यूम पाइप पुलाचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. त्याशिवाय लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे.

दिवसेंदिवस चीनच्या कुरापतीमुळे भारत सरकारने या भागात आक्रमक, वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय लष्करामधील स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या न्योमा सॅपर्सने पूर्व भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने मंगळवारी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिली.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पूर्व लडाखमधील न्योमा आणि निडर परिसरातील गावांदरम्यान नागरिक आणि लष्कराची ये-जा सोपी व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाची पूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. एकूण १ मिनिट ७ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पूल बनवण्याच्या पूर्ण प्रकियेबरोबर लष्कराची काही अवजड वाहनेदेखील या पुलावरून जाताना दिसत आहेत.

या माध्यमातून हा पूल किती भक्कम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न लष्कराने केला आहे. हा पूल बांधण्यासाठी लष्कराच्या इंजिनियर्सनी ह्यूम पाइपचा वापर केला आहे. त्यानंतर त्यावर मजबूत बांधकाम केलं आहे. तसेच या पुलाचे काम कमीतकमी वेळेत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ३० जुलैला लडाखमधील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने ४०० मीटर लांब पुलाचे बांधकाम केल्याची माहिती पुढे आली होती. मात्र हा पूल चीनने १९५८मध्ये बळकावलेल्या भागात बांधण्यात आला आहे.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content