Homeन्यूज अँड व्ह्यूजत्यांनी डोळा मिचकावला...

त्यांनी डोळा मिचकावला आणि मला बरोब्बर समजले..

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्यात झालेले बदल दर्शवत काही वेळा मिष्कील कोपरखळ्या मारल्या आणि मोदी की ग्यारन्टीचा संदर्भ दिला तर काही वेळा थेट त्यांचा एरवीच्या भाषणांच्या विपरित शेजारी राज्यातील निकालांचे संदर्भ दिले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निकालांचाही संदर्भ देत कॉँग्रेसने आश्वासने पाळली नाहीत, त्याचे परिणाम भोगावे लागले, हेही सांगितले. अधिकारी ग्यालरीतून अधिकाऱ्यांनी मला डोळा मिचकावला आणि मी आकडा बरोबर सांगितलाय हे मला समजले, अशी टिप्पणी त्यांनी केली तेव्हा तर विरोधकांसह सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

डोळा

राज्यावरील कर्जाचे आकडे विरोधकांकडून सांगितले जातात, याकडे लक्ष वेधून पवार यांनी विविध राज्यांचे कर्जाचे आकडे सांगितले आणि महाराष्ट्रापेक्षा ते खूपच जास्त आहेत, याकडे लक्ष वेधले. ते सांगताना सारी यादीच त्यांनी वाचून दाखवली आणि त्यावर सत्ताधारी सदस्यांनी ठेका धरत वा वा वा वा.. असे संगीतही दिले. त्यानंतर अजित पवार यांनी हे म्हणजे स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, असा प्रकार आहे, अशी टिप्पणी केली. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

विधिमंडळात आमदार किंवा लोकप्रतिनिधी कामकाज करतात तेव्हा सभृहातील अधिकारी कक्ष तसेच अभ्यागत कक्ष किंवा प्रेक्षक दीर्घा आणि पत्रकारांची ग्यालरीही अदृष्य ग्यालरी आहे, असे संकेत आहेत. याचा अर्थ निवडून आलेले लोकप्रतिनिधी कामकाज करतात तेव्हा या सर्व ग्यालऱ्या त्यात भाग घेत नसतात. त्यामुळे अदृष्य ग्यालरीबद्दल मिष्कील उल्लेख करून अजित पवार यांनी विरोधकांना गप्प केले आणि सभागृहाने विशेषतः सत्ताधारी बाकावरील आमदारांनी त्यांना दाद दिली.

डोळा

राज्याचे स्थूल उत्पन्न ४३ लाख ६७ हजार ७७८ कोटी रुपये आहे, असे राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यावर कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी नेमका आकडा किती आहे, असे विचारले. त्यावर अजित पवार यांनी पुन्हा हा आकडा उच्चारला आणि बरोबर आहे ना, असे म्हणून अध्यक्षांच्या उजव्या हाताला बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कक्षाकडे बघून विचारले. तेथील एका अधिकाऱ्याने हा आकडा बरोबर असल्याचा इशारा केला. त्यावर थोरात यांनी आक्षेप घेताच अजित पवार उत्तरले, अहो मी आकडा बरोबरच सांगितलाय आणि ती अधिकाऱ्यांची ग्यालरी अदृष्य ग्यालरी असते पण तेथून अधिकाऱ्यांनी डोळे मिचकावले आणि मला समजले की मी आकडा बरोबर सांगितला आहे… त्यावर सभागृहात हंशा उसळला.

Continue reading

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...
Skip to content