Friday, November 8, 2024
Homeपब्लिक फिगरमनसुख हिरेनचे रूमाल...

मनसुख हिरेनचे रूमाल शवविच्छेदन अहवालातून गायब?

मनसुख हिरेन यांच्या हत्त्येचे प्रकरण तपासासाठी जेव्हा एटीएसकडे गेले त्यावेळी एटीएसच्या लक्षात आले की, या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेले रुमाल गायब आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला. मनसुख हिरेन यांच्या हत्त्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न नेमका कोणी व कोणत्या मंत्र्यांच्या निर्देशांमुळे केला, याचा तपासही एनआयएने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

एटीएसला छापेमारीपासून कोणी रोखले?

मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचे संपूर्ण चित्रिकरण नाही, डायटोम टेस्ट नाही, त्यासाठी आवश्यक असलेले अवयव उघडण्यात आले आहेत, त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्तबगार एटीएसने याप्रकरणी छापे मारून पुरावे गोळा करण्याचे निश्चित केले. त्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय पंचांना २० मार्चला बोलावून सहा विविध ठिकाणी छापे मारण्याचे एटीएसने ठरवले. तयारी पूर्ण केली. सहा ग्रृप तयार करण्यात आले. पण चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत एटीएसला छापेमारी करण्याची परवानगी सरकारने दिली नाही. इतकेच नव्हे तर त्यानंतरही ही छापेमारीच रद्द झाली. एटीएसला छापेमारी करून पुरावे गोळा करण्यास कोणी रोखले? त्याचे निर्देश कोणत्या मंत्र्यांनी दिले?, असा सवाल आमदार शेलार यांनी केला.

मनसुख यांचे शव जेव्हा मुंब्र्याच्या खाडीत सापडले त्यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या तोंडात रुमाल होते. मात्र त्यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये मृतदेहासोबत सापडलेल्या वस्तुंची जी नोंद आहे त्यामध्ये या रुमालांची नोंद नाही, हे शेलार यांनी अहवालच उघड करून मीडियासमोर आणले. हा महत्त्वाचा पुरावा पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून नष्ट केला असा सवाल त्यांनी केला.

शवविच्छेदनाच्या फक्त १-१ मिनिटांच्या क्लिप

शवविच्छेदन करताना राष्ट्रीय मानवायोगाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण चित्रण करावे लागते. या शवविच्छेदनासाठी दोन तास लागले. पण प्रत्यक्षात यातील एक-एक मिनिटाच्या सात ते आठ क्लिप व्हिडिओ का बनविण्यात आल्या? संपूर्ण चित्रण का करण्यात आले नाही? डॉक्टरांना तसे आदेश कुणी  दिले होते? सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी पुरव्यांशी छेडछाड कुणाच्या सांगण्यावरून केली? तो मंत्री कोण? तो नेता कोण? असे सवालही शेलार यांनी केले.

मनसुख हिरेन

मग, डायटोम टेस्टसाठी का पाठवले?

ज्यावेळी मृतदेहाच्या फुफ्फुसामध्ये पाणी सापडले तर त्या पाण्याची डायटोम टेस्ट करणे आवश्यक होते. हिरेन यांच्या शरीरात पाणी सापडले नाही तरी मग त्यांचे अवयव डायटोम टेस्टसाठी का पाठवण्यात आले? ही टेस्ट जे जे रुण्णालयात होत नाही. तशी परवानगी या रूग्णालयाला नाही. तरीही मनसुख यांचे अवयव जे जे रूग्णालयात का उघडण्यात आले? जे जे रूग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही फक्त अवयवांचे स्कँनिग केले, टेस्ट करण्यात आली नाही, असे म्हटले आहे. मग, या अवयवांची छेडछाड करण्यासाठीच ते जे जे रुग्णालयात आणण्यात आले होते का, असा सवालही त्यांनी केला. मनुसख हिरेन यांनी आत्महत्त्या केली हे दाखवण्यासाठी ही डायटोम टेस्ट करण्याचा घाट घालण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.

स्थानिक पोलिसांना काम करू दिले नाही. जे केले ते चुकीचे केले. पुराव्यात छेडछाड करण्यात आली. एटीएसला छापेमारी करू दिली नाही. त्यामुळेच राज्य सरकारला ही केस एटीएसकडून एनआयएकडे द्यायची नव्हती. म्हणून एनआयएने या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलीस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

कुंटेचा तो’ अहवाल मुखपत्राच्या कार्यालयातून

एक दिवस आधी चौकशीची मागणी केली जाते आणि रश्मी शुक्ला यांच्याप्रकरणी दुसऱ्या  दिवशी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे चौकशी अहवाल सादर करतात. हा अहवाल पण व्हाईट वॉश लावणाराच आहे. आपले काळे झाकण्यासाठी पांढरा रंग लावण्याचा प्रकार आहे. हा अहवाल पाहिल्यावर लक्षात येईल की या अहवालाची निमिर्ती प्रभादेवीतल्या मुखपत्राच्या कार्यालयातून झाली आहे.

कमिटीही व्हाईट वॉश लावण्यासाठीच

राज्य सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेली निवृत्त न्यायमूर्तींची कमिटी म्हणजे नेरोलेक्सचा व्हाईट वॉश लावण्यासाठीच आहे अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपातून अनिल देशमुख यांना क्लिन चिट देण्यासाठी ही कमिटी गठीत करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

बंदा नवाज काँग्रेसचा कार्यकर्ता

२०१७लासुद्धा पोलीस दलातील बदल्यांसाठी एक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी त्यांचा बिमोड झाला. त्यावेळी दाखल झालेल्या एफआयआरमधलेच आरोपी पुन्हा या रॅकेटमध्ये सक्रीय झाल्याचे दिसून येते आहे. या रॅकेटमधील एक आरोपी बंदा नवाज हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून २०१७च्या केसमध्ये त्याला अटक होऊ नये तसेच त्याला वाचवता यावे म्हणून कुंटे यांनी दिलेला अहवाल उपयुक्त ठरणार आहे. यानिमित्ताने या केसमध्ये एक त्रिकोण पूर्ण झाले आहे. शिवसेनेशी संबंधित सचिन वाझे तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि आता काँग्रेसचा बंदा नवाज असे तिन्ही पक्षांचे चेहरे समोर आले आहेत, असेही आशिष शेलार म्हणाले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content