विजय सेल्स, या भारतातील अव्वल ग्राहक रिटेल कंपनीने इंडिया इंटरनॅशनल कंझ्युमर फेअरसह सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाची घोषणा केली आहे आणि या शॉपिंग अनुभवाला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी सॅमसंग, एलजी, सोनी, अॅप्पल, वनप्लस, एमआय, बोट यासारख्या ६५हून अधिक ब्रॅण्ड्सवर सूट देत आहे. हे प्रदर्शन कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर सुरू आहे आणि ग्राहकांना २०२२चा निरोप घेण्यापूर्वी त्यांच्या प्रियजनांना आनंद देण्याची संधी देत आहे…
इंडिया इंटरनॅशनल कंझ्युमर फेअरसोबत सुरू असलेले हे १३-दिवसीय प्रदर्शन मुंबईतल्या बीकेसी येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर चालू असून ते २ जानेवारी रोजी समाप्त होईल. हे प्रदर्शन हा स्वतःच एक अनुभव आहे, जे सर्वात नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या व सर्वोत्तम तंत्रज्ञानाने युक्त ब्रॅण्ड्सच्या सर्व प्रकारांना दाखवते. ग्राहकांना प्रत्यक्ष स्टोअरमध्ये ऑफर केलेल्या सुविधांपेक्षा अधिक व्यापक श्रेणी देते. सर्व ब्रँड्सचे स्वतःचे विभाग असतील, ज्यात ग्राहकांना अभूतपूर्व उत्पादनांना पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सणासुदीच्या जल्लोषात नवीन गॅझेट्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत योग्य आहे.
विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता म्हणाले की, आम्ही आमचे रिटेल व ऑनलाईन स्टोअरमध्ये एण्ड ऑफ द इअर सेल सुरू केले असताना हे प्रदर्शन, समाप्त होत असलेल्या या वर्षाचे आणखी एक खास आकर्षण आहे. आम्ही कोविडमुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर या प्रदर्शनाला आणखी भव्य स्वरूपात आयोजित केले आहे. आम्ही २०२० आणि २०२१ मध्ये या प्रदर्शनाला चुकवले. खरेतर आम्ही २०१९मधील आकडेवारींच्या तुलनेत आमची विकास आकडेवारी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत.

विजय सेल्सद्वारे एप्पल उत्पादनांवर विशेष ऑफर्स
आपण २०२२ या वर्षाला निरोप देत असताना भारताची आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर साखळी विजय सेल्सने ३१ डिसेंबरपर्यंत एप्पल डेज मोहिमेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाची घोषणा केली आहे. ग्राहकांना आपल्या १२०पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स आणि विजयसेल्सडॉटकॉमवरही विविध डील्सचा आनंद घेता येईल.
एप्पलच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी या ग्राहकोपयोगी रिटेल कंपनीने नव्याने आलेल्या आयफोन १४वर एक खास किंमत ठेवली आहे. ग्राहकांना हा फोन फक्त ६१,९०० रूपयांना घेता येईल. आयफोन १४ची किंमत सामान्यतः ७९,९०० रूपये आहे. तो ७४,९०० अधिक एचडीएफसी बँक कार्ड्सवर ५००० रूपयांच्या तत्काळ सवलतीवर विकला जात आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यायचा असेल आणि त्याचे एक्स्चेंज मूल्य किमान ५००० असेल तर विजय सेल्सकडून त्यावर आणखी ३००० रूपये वाढवले जातील आणि एकूण सवलतीची रक्कम १८,००० रूपयांपर्यंत जाऊन नवीन आयफोन १४ तुम्हाला फक्त ६१,९०० रूपयांत मिळेल.
इतर आयफोन्स तसेच सीरिज ८ घड्याळे, एअरपॉड्स प्रो (२ जनरेशन) यांच्यावर मॅगसेफ चार्जिंग केस, मॅकबुक्स, आयपॅड्स, घड्याळे, एप्पल केअर +, एप्पल एक्सेसरीज यांच्यावरही अनेक डील्स उपलब्ध आहेत.
स्मार्टफोनच्या वर्गवारीत आयफोन १४ची किंमत ६९,९०० रूपयांपासून सुरू होते, आयफोन १४ प्लस ७८,६९९ रूपयांपासून, आयफोन १४ प्रो १,२६,१०० पासून, आयफोन १४ प्रो मॅक्स १,३५,८०० रूपयांपासून, आयफोन १२ ची किंमत ५२,९०० रूपयांपासून सुरू होते तर आयफोन १३ ची किंमत ६२,९००पासून सुरू होते.
आयपॅडच्या श्रेणीत आयपॅड ९ जनरेशनची सुरूवात २५,७०० रूपयांपासून होते, आयपॅच १० जनरेशनची सुरूवात ३९,९४० पासून, आयपॅड एअर ५ जनरेशन ५१,७०० रूपयांपासून तर आयपॅड प्रोची सुरूवात ७३,००० रूपयांपासून होते.
लॅपटॉपच्या श्रेणीत मॅकबुक एअर एम१ चिपसोबत ७७,९०० रूपयांपासून सुरू होतो, मॅकबुक एअर एम२ चिप ९५,५०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम२ चिपसोबत १,०४,३०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम१ प्रो चिपची सुरूवात १,०७,५०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम१ प्रो मॅक्स चिपची सुरूवात २,८०,३०० रूपयांपासून होते.
स्मार्टवॉचच्या श्रेणीत एप्पल वॉच सीरिज ८ची सुरूवात ३९,९०० रूपयांपासून, एप्पल वॉच एसई (२ जनरेशन) २६,०००पासून तर एप्पल वॉच अल्ट्राची सुरूवात ८२,३०० रूपयांपासून होते. ऑडिओ श्रेणीत एअरपॉड्स प्रो (२ जनरेशन) २३,४०० रूपयांच उपलब्ध असेल.

