Homeकल्चर +उस्ताद वसीम अहमद...

उस्ताद वसीम अहमद खान यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२४ या वर्षीचा गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार आग्रा घराण्याचे प्रतिथयश हिंदुस्थानी शास्त्रीय गायक कोलकात्याचे उस्ताद वसीम अहमद खान यांना जाहीर करण्यात आला आहे.

१ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उस्ताद वसीम अहमद खान हे उस्ताद आटा हुसेन खान, नसीम हुसेन खान आणि शफी अहमद खान यांचे शिष्य आहेत. पुरस्कार वितरण समारंभ ९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होईल.

गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार २०१७ साली आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ प्रस्थापित केला. ५० वर्षे वयाखालील प्रथितयश हिंदुस्थानी गायक किंवा गायिकेला तो दिला जातो. अधिक माहितीसाठी www.gspuraskar.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content