Homeचिट चॅट'गामा फाऊंडेशन'ची इकोफ्रेंडली...

‘गामा फाऊंडेशन’ची इकोफ्रेंडली गणेशोत्सव आरास स्पर्धा!

सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गामा फाऊंडेशनने यावर्षीदेखील इकोफ्रेंडली गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले असून महाराष्ट्रातील हौशी गणेशभक्तांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सज्ज झाली आहे.

गणेशोत्सवात सगळीकडेच भक्तीमय वातावरण असते. कोरोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षी आणि यावर्षीदेखील आपण एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन घेणे थोडे कठीण आहे. आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक आणि घरगुती पद्धतीने मोठ्या श्रद्धेने गणेशाची पूजा केली जाते. अनेक जण आपल्या घरात गणपतीची खूप सुंदर आरास आणि सजावट करतात. गेली अनेक वर्षे विविध संस्था पुढाकार घेऊन घरगुती सजावट स्पर्धांचे आयोजन करून हौशी गणेशभक्तांचे कौतुक करीत आहेत.

आपल्याकडे सध्या निर्बंध जरी शिथिल झाले असले तरीही अजूनही धोका संपूर्ण टळलेला नाही. त्यामुळे यावर्षी ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली आह. ही स्पर्धा खालीलप्रमाणे असेल.

1) ही स्पर्धा फक्त घरगुती गणेशोत्सवाकरीता आहे.

2) सजावट साहित्य पर्यावरणपूरक असावे. थर्माकॉल, प्लास्टिक इत्यादीसारख्या पर्यावरणास धोकादायक वस्तूंचा वापर नसावा.

3) आपल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचा फोटो व त्याबाबत थोडक्यात माहिती असे आम्हाला खालील email वर pdf स्वरूपात पाठवावे व त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता तसेच शहराचे नाव, संपर्क क्रमांक (फोन नं.) व इमेल आयडीसुद्धा नमूद करावे.

4) स्पर्धेत एका घरातून एकच व्यक्ती सहभागी होऊ शकते.

या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख – शनिवार दि. १८/०९/२०२१ असून सजावटीचे फोटो व माहिती gamafoundation.mumbai@gmail.com या ईमेलवर पाठवावी.

अंतिम फेरीत ६ स्पर्धक असतील, यातून ४ पारितोषिके दिली जातील-

प्रथम पारितोषिक- 751/-, द्वितीय पारितोषिक- 551/-, तृतीय पारितोषिक- 251/-, उत्तेजनार्थ पारितोषिक- 151/-

अंतिम फेरी शनिवार दि. २५/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता झूम मिटींगद्वारे होईल. यामध्ये स्पर्धकांना परीक्षक काही प्रश्न विचारतील आणि नंतर निकाल जाहीर केला जाईल.

अधिक माहितीकरीता संपर्क-
भूषण शितूत 9821154796 आणि महेश कालेकर 9769348413
Email –gamafoundation.mumbai@gmail.com

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content