Homeडेली पल्सफ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे!

‘विकसित भारत’ आणि ‘भारत – लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथ येथे होणारे 75व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिलाकेंद्रित असेल. काल नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने म्हणाले की, महिला संचलन करणार्‍या तुकड्या या संचलनाचा प्रमुख भाग असतील, ज्यात राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/ संघटना यांचे बहुतांश चित्ररथ देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगतीची झलक प्रदर्शित करतील. भारत ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची जननी आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या अनुषंगाने संकल्पनांची निवड करण्यात आल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे गिरीधर अरमाने म्हणाले.

प्रथमच 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्यांसह संचलनाला सुरुवात होईल. महिला कलाकारांद्वारे शंख, नादस्वरम, नगाडा वाजवून या संचलनाची सुरुवात केली जाईल. या संचलनात प्रथमच कर्तव्यपथावरून कूच करणारी तिन्ही सेनादलातील सर्व महिलांचे पथक पहायला मिळणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल.

संचलनाला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होईल आणि ते सुमारे 90 मिनिटे चालेल.

प्रमुख पाहुणे

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे गिरीधर अरमाने म्हणाले. फ्रान्समधील 95 सदस्यांचे मार्चिंग पथक आणि 33 सदस्यांचे बँड पथकही या संचलनात सहभागी होणार आहेत. फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानासह, एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होणार आहेत.

विशेष पाहुणे

यावर्षी सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांना प्रजासत्ताक दिवस संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

या विशेष पाहुण्यांमध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. व्हायब्रंट गावांचे सरपंच, स्वच्छ भारत अभियान, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील महिला कर्मचारी, इस्रोच्या महिला अंतराळ शास्त्रज्ञ, योग शिक्षक (आयुष्मान भारत), आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते आणि पॅरालिम्पिक पदक विजेते यांच्या सोबतीने सर्वोत्कृष्ट बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात संदर्भ आलेल्या व्यक्ती तसेच प्रकल्प वीर गाथा 3.0 चे ‘सुपर-100’ आणि राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचे विजेते देखील संचलन पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हे विशेष पाहुणे कर्तव्यपथावर विशेष आसन व्यवस्थेत विराजमान होतील.

व्हायब्रंट गावांची खडतर उपजीविका पाहता देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग व्हावा यासाठी या गावांचा विशेष अतिथींच्या यादीत समावेश करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहिती गिरीधर अरमाने यांनी दिली.

चित्ररथ

एकूण 25 चित्ररथ – 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच नऊ मंत्रालये किंवा विभागांचे चित्ररथ संचलनादरम्यान कर्तव्य पथावर उतरतील. यात महाराष्ट्र्राचाही समावेश आहे.

विशेष नाणी आणि टपाल तिकीटे

राष्ट्र या वर्षी आपल्या प्रजासत्ताकचे 75वे वर्ष साजरे करत असताना या उत्सवादरम्यान संरक्षण मंत्रालय एक विशेष नाणे आणि टपाल तिकिट जारी करेल.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारे कार्यक्रम

प्रघातानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताकदिन सोहळ्यातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार, आदिवासी पाहुणे इत्यादींची भेट घेतील.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content