Homeहेल्थ इज वेल्थकोविड लसीकरणासाठी लोककलांचा...

कोविड लसीकरणासाठी लोककलांचा वापर!

भारताने आता, 45 वर्षांपुढील प्रत्येकासाठी कोविड-19 लसीकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार लोकांमधील लसीची उत्सुकता आणि संकोच या संमिश्र आव्हानाचा सामना करण्यासाठी लसीकरणाच्या समर्थनार्थ नाविन्यपूर्ण पद्धती वापरल्या जाणार आहेत. स्थानिक समुदायांमध्ये प्रतिसाद निर्माण करण्यासाठी लोकप्रिय कला प्रकारांचा वापर करुन मुख्य संदेश प्रसारित करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा यांनी सर्जनशील मार्ग निवडला आहे.

फेब्रुवारी ते मे 2021 या कालावधीत विशेष लोकसंपर्क समर्थन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील  36 जिल्ह्यांमध्ये तर गोव्यातील दोन जिल्ह्यांमध्ये मोक्याच्या 11,400 ठिकाणी स्थानिक भाषांमधून पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरण संदेश पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक पथके तैनात केली आहेत.

सहकार्य  मोहिमेअंतर्गत  प्रादेशिक भाषा व स्थानिक बोलीभाषेत कोविड-19 संदर्भातील माहितीचा प्रसार करण्यासाठी एलईडी पॅनेल्स व ऑडिओ घोषणा प्रणालीने सुसज्ज अशा 16 व्हॅन (महाराष्ट्रात 15 आणि गोव्यात 1) आणि 89 कलापथके तैनात करण्यात आली आहेत.

लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि संकोच निर्माण करणाऱ्या अफवा दूर करण्यासाठी कोविड-19 रोगाबाबत माहिती, योग्य वर्तन आणि लसीकरणाची अद्ययावत माहिती याचा पुनरुच्चार नाट्यसंहितेत केला आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील प्रेक्षकांमधले राजेश दिवे वैयक्तिक कामासाठी नाशिकहून आले आहेत. ते म्हणाले की, लॉकडाउन उठवल्यानंतर वारंवार हात धुण्याविषयी आणि सामाजिक अंतर पाळण्याबाबत मी बेफिकीर झालो. पथनाट्य पाहताना मला जाणवले की, रोजच्या दैनंदिन व्यवहारात या पद्धतींचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे. जेव्हा कोविड  लसीकरण सामान्य जनतेसाठी उपलब्ध होईल तेव्हा मी आणि माझे कुटूंब लस घेण्यासाठी उत्सुक आहोत.

ही लसीकरण समर्थन मोहीम, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत, प्रादेशिक लोकसंपर्क विभाग (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश), महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, भारतातील डब्ल्यूएचओ कार्यालय आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येत  आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content