Tuesday, December 24, 2024
Homeएनसर्कल'फाइंडॅबिलिटी सायन्सेस', छ....

‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’, छ. संभाजी नगरची नवी ओळख

छत्रपती संभाजी नगर, हे ऐतिहासिक आणि नाविन्यपूर्ण असे दोन्हीचे मिश्रण असलेले आधुनिक शहर आहे. अशा या प्रगतीशील शहरात ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी म्हणून नुकतीच उदयास आली आहे. या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्वसमावेशक आणि व्यावसायिक (औद्योगिक) समृद्धीची संस्कृती या सर्वांचा अनोखा समन्वय साधला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील प्रतिभावंत तंत्रज्ञ, या ऐतिहासिक शहराने आकर्षित केले आहेत.

छत्रपती संभाजी नगर हे पारंपरिक पद्धतीने आय टी हब म्हणून ओळखले जात नसले तरी ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ने या शहरात आपले असे अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता इनोवेशन सेंटर स्थापित केले आहे. या कामगिरीमुळे छत्रपती संभाजी नगरला जागतिक तंत्रज्ञान पटलावर स्थान मिळाले असून स्थानिक तंत्रज्ञान क्षेत्रातही क्रांती घडवून आणली आहे. शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करून, इंटर्नशिप देऊन, प्रगत तंत्रज्ञानावरील सेमिनार घेऊन कंपनी स्थानिक तंत्रज्ञान प्राविण्य विकसित करण्यास योगदान देत आहे.

‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’चे इनोवेशन आणि विकासाचे प्रयत्न स्थानिक सीमा पार करतात. कंपनी एम्आयटी, टोकियो विद्यापीठ (टोडाई विद्यापीठ) आणि वूस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यासारख्या प्रतिष्ठित संस्थांसोबत आदानप्रदान कार्यक्रम राबवते. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे

तज्ञ मिळत आहेत. कंपनीच्या विशेष उपक्रमाद्वारे, परदेशात किंवा बाहेरगावी कार्यरत असलेल्या अभियंत्यांना स्वगृही परत येऊनही आधुनिक अशा कृत्रिम बुद्धिमतेच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमांमुळे स्थानिक आर्थिक वाढीस चालना मिळून कुटुंबियांच्या कल्याणालाही बळकटी येते.

‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’मध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. नियमित क्रीडा स्पर्धा आणि शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाचा सराव, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी आणि सतत कार्यरत राहण्यासाठीची जीवनशैली प्रोत्साहित केली जाते. इशा फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतल्या जाणाऱ्या योगवर्गामुळे मानसिक शांती व बौद्धिक समतोल राखण्यास मदत होते. ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’मध्ये मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घेतली जाते. कॉर्पोरेट सक्सेस ट्रेनर सुनील पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ‘मिरॅकल मॉर्निंग रिचुअल वर्कशॉप’ यासारख्या उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना यशस्वी आणि सुखी राहाण्यासाठी मदत होते. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ हे आणि असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठीही आयोजित करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा मिळतो. सोयिस्कर कामाच्या वेळा आणि वाढीव रजा इ. पर्यायाद्वारे काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधला जातो. या तऱ्हेच्या सहकार्याने व्यावसायिक वृद्धीच्या संधी न गमावता वैयक्तिक जबाबदारीही पार पाडता येते.

‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ची जागतिक उपस्थिती कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव आणि करिअर प्रगतीची संधी देते. त्यामुळे वैविध्यपूर्ण संस्कृती आणि बाजारपेठांशी सुसंवाद साधता येतो. या कंपनीत ४०% महिला आणि ६०% पुरुष कर्मचारी कार्यरत असून विविधता आणि सर्वसमावेशकता ही कंपनीच्या कार्यसंस्कृतीची मूलभूत तत्त्वे असल्यामुळे समानता आणि आदराची भावना निर्माण होते. नेतृत्त्वगण पारदर्शकता आणि सहजसुलभ उपलब्धता राखते आणि भेदभावाविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका घेते. त्यामुळे सर्वांसाठी सुरक्षित आणि सक्षमीकरणाचे वातावरण निर्माण होते. 

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content