Homeकल्चर +अॅक्शनपॅक्ड 'गौरीशंकर'चा धमाकेदार...

अॅक्शनपॅक्ड ‘गौरीशंकर’चा धमाकेदार ट्रेलर लाँच

अॅक्शनपॅक्ड आणि टाळीबाज संवाद असलेल्या गौरीशंकर, या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच लॉँच झाला. अन्यायाच्या बदल्याची, शोधाची, थरारक, रंजक अशी कहाणी या चित्रपटातून पाहायला मिळणार असून २८ फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.

मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या “गौरीशंकर” या चित्रपटाची निर्मिती विशाल संपत यांनी केली आहे. ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हरेकृष्ण गौडा यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी, दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रशांत आणि निशांत यांनी संगीतदिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत कोळंबकर यांनी गीतलेखन, अमित जावळकर यांनी संकलन, राशिद मेहता यांनी अॅक्शन, अमित चिंचघरकर यांनी कलादिग्दर्शन, मेकअप नितिन दांडेकर, धनश्री साळेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी निभावली असून कार्यकारी निर्माता म्हणून सिद्धेश आयरे यांनी काम पाहिले आहे.

प्रेम, अन्याय, बदला, शोध असं या चित्रपटाचं आशयसूत्र असल्याचं, कथानक न उलगडता अॅक्शनवर भर देण्यात आल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्याशिवाय उत्तम लोकेशन्सवरचे रोमँटिक प्रसंगही त्यात आहेत. त्यामुळे अत्यंत रांगडं व्यक्तिमत्त्व असलेल्या नायकाच्या आयुष्यात काय घडलं आहे, त्याचा शोध कशा पद्धतीनं घेतो याची उत्सुकता या ट्रेलरनं निर्माण केली आहे. उत्तम दर्जाचे अॅक्शन सिक्वेन्स या ट्रेलरमध्ये दिसतात. त्यामुळे दर्जेदार अॅक्शनपटाची मराठीतील उणीव भरून निघण्याची प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content