शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा चौथा भाग, परीक्षा पे चर्चा 2021साठी नोंदणी प्रक्रियेची सुरूवात होत असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले आहे.
परीक्षा आणि परीक्षेचा ताण याच्याशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची पंतप्रधानांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आश्वासक शैलीत उत्तरे देणारा परीक्षा पे चर्चा हा बहुप्रतीक्षित वार्षिक कार्यक्रम आहे. यावेळी हा कार्यक्रम आभासी पद्धतीने होणार असल्याची माहिती पोखरीयाल यांनी दिली आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या ताणाबाबत आणि या विषयाशी निगडीत प्रश्न MyGov या मंचामार्फत मागवण्यात येतील आणि निवडक प्रश्नांचा मुख्य कार्यक्रमात समावेश केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
देशभरातून शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड, MyGov या मंचावर त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या ऑनलाईन सृजनात्मक लेखन स्पर्धेतून करण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी स्पर्धेत विविध विषय ठेवण्यात आले आहेत. इच्छुक आपले प्रश्नही या मंचावर सादर करू शकतात. निवड झालेल्या व्यक्ती आपापल्या राज्य/केंद्रशासित प्रदेश मुख्यालयातून या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यांना विशेष पीपीसी (परीक्षा पे चर्चा) कीट देण्यात येईल. ऑनलाईन सृजनात्मक लेखन स्पर्धेसाठीचे पोर्टल 14 मार्च 2021पर्यंत खुले राहील असेही त्यांनी सांगितले आहे. पोर्टलच्या लिंकसाठी इथे क्लिक करा: https://innovateindia.mygov.in/ppc-2021/
MyGovवरच्या ऑनलाईन सृजनात्मक लेखन स्पर्धेसाठीचे विषय
विद्यार्थ्यांसाठी
विषय 1: परीक्षा उत्सवासारख्या असतात, त्या साजऱ्या करा.
कार्य– आपल्या आवडत्या विषयाशी निगडीत उत्सव साकार करा.
विषय 2: अतुल्य भारत, पर्यटन करा.
कार्य: आपल्या मित्राने आपल्या शहराला तीन दिवसांची भेट दिली आहे अशी कल्पना करा. या वास्तव्यात त्याच्यासाठी/तिच्यासाठी खालील विभागात आपण कोणत्या संस्मरणीय बाबी कराल?
– भेट देण्याची ठिकाणे (शब्दमर्यादा: 500 शब्द)
– रुचकर खाद्य (शब्दमर्यादा: 500 शब्द)
– संस्मरणीय अनुभव (शब्दमर्यादा: 500 शब्द)
विषय 3: एका प्रवासाची सांगता, दुसऱ्याची सुरूवात.
कार्य: शालेय जीवनातले आपले संस्मरणीय अनुभव 1500 शब्दांपर्यंत रेखाटा.
विषय 4: आकांक्षा, केवळ बाळगू नका तर कृती करा.
कृती: संसाधने आणि संधी यावर मर्यादा नसेल तर समाजासाठी आपण काय कराल? आणि त्याचे कारण यासह 1500 शब्दापर्यंत लिहा.
विषय 5: कृतज्ञ राहा.
कार्य: आपण आपल्याला ज्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. त्यांच्यासाठी 500 शब्दांत कृतज्ञता कार्ड तयार करा.
शिक्षकांसाठीः
विषय: ऑनलाईन शिक्षण प्रणाली – त्याचे फायदे आणि यात अधिक सुधारणा कशी करता येईल?
कार्य: सुमारे 1500 शब्दांपर्यंत या विषयावर लिहा.
पालकांसाठीः
विषय 1: आपले शब्द आपल्या पाल्याला प्रोत्साहित करतात, नेहमीप्रमाणेच त्यांना प्रोत्साहन द्या.
कार्य: आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी आपला दृष्टीकोन यावर लिहा. पहिले वाक्य आपल्या मुलाला लिहू द्या, त्यानंतर पुढचे आपण लिहा. (शब्दमर्यादा: 1500 शब्द)
विषय 2: आपल्या मुलाचे मित्र व्हा, नैराश्याला थारा देऊ नका.
कार्य: आपल्या मुलाला पत्र लिहा. आपल्यासाठी आपला पाल्य खास कसा आहे याचे वर्णन करा. (शब्दमर्यादा: 100 शब्द)