Homeमुंबई स्पेशलआनंद लुटा फळाफुलांच्या...

आनंद लुटा फळाफुलांच्या प्रदर्शनाचा एरोप्लेन गार्डनमध्ये!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन येथे फळे फुले भाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

गुलाब, झेंडू ,झिनीया, शेवंती, विविध प्रकारच्या ऑर्किड यांचे मिळून सुंदर देखावे याठिकाणी तयार करण्यात आले आहेत. यात विविध रंगांच्या फुलांच्या सजावटीसोबत प्रत्येक रंगाचा आपल्या आयुष्यात असलेला अर्थ स्पष्ट केला आहे. ‘चला जगूया रंग आयुष्याचे’ या संकल्पनेवर आधारित विविध फुलांच्या मदतीने इंद्रधनुष्य तयार करण्यात आलेला आहे. त्यातले विविध रंग, आपल्या जीवनात असलेले महत्त्व असा प्रदर्शनाचा आशय आहे. लाल रंग प्रेम दर्शवतो. हिरवा रंग सृष्टी आणि त्याची वाढ दर्शवतो. पिवळ्या रंग आनंद, नारंगी रंग नवनिर्मिती असे विविध रंग त्याचे अर्थ आणि त्या रंगांच्या फुलांनी निर्माण केलेल्या कलाकृती याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

आनंद, आशा, अपेक्षा, ज्ञान, योग, अध्यात्मिकता, प्रेम, विश्वास अशा विविध मानवी भावना दर्शवणारे रंग आणि त्यांची फुलं यांचा मिळून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. फळे, फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी आज, रविवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत व उद्या, सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content