मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुमती गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने सौरभ काडगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम येत्या रविवारी, ८ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना तेजोवृष जोशी तबल्यावर तर ओंकार अग्निहोत्री संवादिनीवर साथ देतील.
सौरभ काडगावकर हे भारतीय शास्त्रीय संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे वडील सुनील काडगावकर यांच्याकडून घेतले. पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या समर्थ मार्गदर्शनामुळेच त्यांची कला अधिक बहरली. जयपूर अत्रवली घराण्याची त्यांची गायनशैली असून काही वर्षे त्यांनी बारामती येथील गांधर्व महाविद्यालयात अध्यापन केले आहे. त्यांचे संगीतात एमएदेखील पूर्ण झाले आहे.
अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.