Homeकल्चर +मंगळवारी ठाण्याच्या डॉ....

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. ‘प्री-वेडिंग’!

.. आणि मग एकवेळ अशी येते की आता थांबून चालायचं नाही. लग्न उशिरा झालंतरी चालेल, पण जोडीदार आयुष्यभर सोबत हवा. लग्न हा केवळ जीवनातला एक कार्यक्रम नव्हे तो दोन जीवांमधील गहिरा संवाद आहे. पदरात पडेल त्याच्याशी विवाह केलाच पाहिजे, अशी वेळ तरुण-तरुणींवर येते. याच मुद्द्यावरच येवनेट मल्टिमीडिया प्रा. लि. प्रस्तूत ‘प्री-वेडिंग’ हे मयूर योगी लिखित आणि डॉ. गणेश घुगरे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर येत आहे. प्रीती जाटे आणि प्रशांत या दोघा कलाकारांचंही असंच आहे. एकमेकांना जाणून घेण्यासाठी ते भेटले आहेत. काय होतं या भेटीत? हे जाणून घेण्यासाठी पाहा येत्या मंगळवारी, १३ मे रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content