Friday, January 3, 2025
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्र विधानसभासोबतच होणार...

महाराष्ट्र विधानसभासोबतच होणार जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका!

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड विधानसभांच्या निवडणुकांसोबतच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर भारत निवडणूक आयोगाने आता हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकरीता मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण सुरू केले आहे. यासाठी 1 जुलै 2024 पात्रता तारीख म्हणून निश्चित केली आहे. तीन राज्यांतील विद्यमान विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 03 नोव्हेंबर 2024, 26 नोव्हेंबर 2024 आणि 05 जानेवारी 2025 रोजी संपत आहे आणि या विधानसभांच्या निवडणुका त्यांच्या मुदती पूर्ण होण्यापूर्वी आयोजित करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र

याशिवाय, मतदारसंघांच्या सीमांकनानंतर नवीन सदन स्थापन करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांचा मोठा सहभाग पाहता, निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 पात्रता तारीख धरून जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचेही निर्देश दिले आहेत.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पात्रता तारीख 1 जानेवारी 2024 धरून मतदारयाद्यांचे शेवटचे विशेष सारांश पुनरिक्षण करण्यात आले. निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021द्वारे लोकप्रतिनिधी कायदा, 1950च्या कलम 14मध्ये सुधारणा केल्यानंतर आता एका वर्षात चार पात्रता तारखांची तरतूद उपलब्ध आहे. त्यानुसार, सर्व पात्र आणि नावनोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदारयादीत नाव नोंदवण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि त्याद्वारे येत्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळावी यासाठी आयोगाने हरयाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात 01.07.2024 पात्रता तारीख निश्चित करून मतदारयाद्यांची दुसरी विशेष सारांश पुनरावृत्ती (एसएसआर) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र

अचूक, सर्वसामावेशक आणि अद्ययावत मतदारयाद्या हा मुक्त, निर्भय आणि विश्वासार्ह निवडणुकांसाठी मतदारयादीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, आयोग प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सखोल पुर्नरिक्षण-पूर्व उपक्रम राबवण्यावर विशेष भर देत आहे.

पुर्नरिक्षण-पूर्व उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

A. मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांद्वारे घरोघरी सर्वेक्षण: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी खालील माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी भेट देतील:

• नाव नोंदणी नसलेले पात्र नागरिक (01.07.2024 रोजी पात्र)

• अनेक नोंदी/मृत मतदार/कायमचे स्थलांतरित मतदार

• मतदार याद्यांच्या नोंदींमध्ये सुधारणा

B. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण किंवा पुनर्रचना:

मतदारांच्या सुविधेसाठी अगदी लहान वस्तीच्या जवळ मतदान केंद्रे उभारण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यात बाधा ठरणाऱ्या भीती, मौन किंवा इतर घटकांची शक्यता निष्क्रीय करण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच हेतूने, लोकसभा निवडणुक 2024पूर्वी निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2023 रोजीच्या निर्देशांद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना उंच इमारतीत राहणाऱ्या मतदारांसाठी किंवा समूह गृहनिर्माण सोसायट्या मध्ये राहणाऱ्या मतदारांना सर्वात सोयीस्कर ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्याचे निर्देश दिले होते. त्या सोबतच शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे मतदार तसेच शहरी, निमशहरी आणि ग्रामीण विभागाच्या विस्तारित क्षेत्रात राहणाऱ्या मतदारांसाठी देखील सर्वात सोयीस्कर ठिकाणी मतदान केंद्र उभारण्याचे निर्देश दिले होते.

महाराष्ट्र

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान, अशा मतदान केंद्रांवर रहिवासी सोसायट्यांव्यतिरिक्त उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे अनुभवाला आले आहे. त्यामुळे आयोगाने पुन्हा एकदा सीईओंना निर्देश दिले. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणादरम्यान व्यापक सर्वेक्षण केले पाहिजे आणि त्या उद्देशासाठी पुरेशा खोल्या/सामान्य सुविधा क्षेत्र/सामुदायिक हॉल/शाळा असलेल्या समूह गृहनिर्माण सोसायट्या आणि उच्चभ्रू निवासी इमारती रहिवासी मतदारांसाठी योग्य प्रक्रियेचे पालन करून मतदान केंद्र उभारण्यासाठी निवडल्या जातील. 

C. जेथे आवश्यक असेल तेथे अस्पष्ट, निकृष्ट दर्जाची, योग्य तपशील न दर्शवणारी आणि मानवी प्रतिमांचा समावेश नसलेली छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे सुनिश्चित करणे.

मतदारयादीची सर्वसमावेशकता, अचूकता आणि दर्जा सुनिश्चित करण्यावर निवडणूक आयोगाचे कायमच सखोल लक्ष केंद्रीत राहिले आहे. जेणेकरून कोणताही पात्र नागरिक मतदारयादीत समाविष्ट होण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही तसेच शक्य तितक्या प्रमाणात कोणत्याही नकली आणि अपात्र नोंदीशिवाय मतदार यादी कायम त्रुटीमुक्त राहील. त्यामुळे, जर आतापर्यंत  नावनोंदणी केली नसेल तर आगामी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

Continue reading

‘मिशन अयोध्या’चा संगीत प्रदर्शन सोहळा थाटामाटात संपन्न!

अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारीला विविध चित्रपटगृहांत झळकणाऱ्या आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि...

हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची सांगता

मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातलल्या मेहफिल-ए-जहांगिरिया दर्ग्यात हजरत ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या उर्सची नुकतीच सांगता झाली. गौहर ए नायब, मलिक उल मशैख, सिराज उल औलिया, हजरत अलहज ख्वाजा सूफी मजीद उल हसन शाहसाहब रहमतुल्ला अलैह यांचा उर्स राष्ट्रात शांतीसाठी दुआ...

रविवारी आनंद घ्या शाल्मली जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य.  वि. भातखंडे यांच्या वतीने पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत येत्या रविवारी,  ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता जयपूरच्या अत्रौली घराण्याच्या गायिका शाल्मली जोशी यांचे गायन होणार आहे. त्यांना...
Skip to content