Homeएनसर्कलजी-20च्या मुंबईतल्या बैठकांत...

जी-20च्या मुंबईतल्या बैठकांत डेटा आणि जीवनशैलीवर चर्चा!

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास कार्य गटाच्या चार दिवसीय बैठकांमध्ये झालेल्या पाच विधायक चर्चासत्रांची काल सांगता झाली.

तिसऱ्या सत्राअंतर्गत विकासासाठी डेटा, या चर्चेची सुरुवात करताना, विकास कार्य गटाचे अध्यक्षस्थान, सह सचिव नागराज नायडू आणि एनम गंभीर यांनी संयुक्तरित्या भूषविले. यावेळी, 2030 अजेंड्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना गती देण्याविषयी चर्चा झाली. “… 2030पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टांची सिद्धता करण्यासाठी, सर्व देश प्रयत्न करत असताना, आता जागतिक स्तरावर समस्याच्या निराकरणासाठी, डिजिटल उपाययोजना आणि प्रणालींवर लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून समाजहिताची कार्ये आणि सेवा प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतील,” असे त्यांनी या बैठकीत सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त संचालक (Meity) आणि डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप (डिजिटल अर्थव्यवस्था कृती गट)चे प्रतिनिधी क्षितिज कुशाग्रा यांनी या समस्येचे परस्परावलंबी हितसंबंधविषयक स्वरूप आणि जी-20चे दोन प्रवाह म्हणजेच ट्रॅकदरम्यानच्या समन्वयावर प्रकाश टाकला. त्यानंतर, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे  तंत्रज्ञानावरील विशेष दूत, अमनदीप सिंग गिल यांनी आरोग्य, शिक्षण, कृषी आणि अन्नसुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये डेटा सेटचे डिजिटल इंटेलिजेंसमध्ये प्रभावी संकलन, साठा, विश्लेषण आणि रूपांतर करून त्यायोगे, विकास आणि सहकार्यासाठी निर्माण होऊ शकणाऱ्या जागतिक संधींची रूपरेषा मांडली.

शेवटी, G-20 राष्ट्रांनी आपली मते मांडण्यास सुरुवात करण्यापूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकासविषयक परिषदेचे (UNCTAD) ट्रोबजर्न फ्रेड्रिक्सन यांनी विकासासाठी डेटाचा वापर करण्यास कितपत आणि कसा वाव आहे, याविषयाचे त्यांचे विश्लेषण सादर केले. यावेळी जी-20 सदस्य देशांनी, दर्जेदार आणि विश्वासार्ह डेटाची गरज, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाजाची भूमिका, डिजिटल दरी कमी करण्यासाठीची आवश्यक पावले, विकसनशील राष्ट्रांमध्ये क्षमता वाढवणे आणि विकास कृती गटांच्याच्या कामांशी डिजिटल आर्थिक कृती गटाच्या कार्याला जोडून घेणे, यावर आपली मते मांडली.

चौथ्या सत्रात, पर्यावरणस्नेही जीवनशैली (LiFE) वर लक्ष केंद्रित करण्यात आले. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, भारताने हवामानबदलाच्या समस्येवरील ठोस उपाय म्हणून याला प्रमुख प्राधान्य दिले आहे. “आपण पर्यावरणाचा कसा वापर करतो, याची पुनर्कल्पना करुन, ते प्रत्यक्षात आणण्यासाठीची व्यवस्था आपण कशी उभारू शकतो, हे महत्त्वाचे आहे,’ असे मत आणि DWGच्या सहअध्यक्षा एनम गंभीर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

भारताच्या प्राचीन शाश्वत परंपरांमधून प्रेरणा घेतलेला, LiFE हा शाश्वत जीवनासाठी एक धाडसी, परिवर्तनशील दृष्टीकोन आहे जो उपभोग (मागणी) आणि उत्पादन (पुरवठा) दोन्ही पद्धतींमध्ये जागतिक बदल सुचवतो. हा प्रस्ताव, ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य’, या भारताच्या G-20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी, जी सर्व जीवसृष्टींचे  परस्परसंबंध अधोरेखित करते आणि या सामायिक ग्रहासाठी, या ग्रहावर राहणाऱ्या सर्वांवर समान जबाबदारी ठेवते, या संकल्पनेशीही जवळचा संबंध दाखवतो.

संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेचे (UNIDO) जुसेपे डी सिमोन आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमातील (UNEP) दिव्या दत्त यांचे सादरीकरण आर्थिक आणि धोरणात्मक आराखडा, LiFE ला डेटा-चालित परिप्रेक्ष्यांसह प्रदान केलेल्या पर्यायी मागणी-पुरवठा प्रतिमानाचे प्रमाण आणि परिणाम प्रतिनिधींना स्वीकारण्यास सक्षम करणारे होते. दत्त यांनी वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि क्रॉस-कटिंग धोरण बदलाच्या संदर्भात “शाश्वत जीवनशैली महत्त्वाकांक्षी बनवण्याचे” महत्त्वदेखील मांडले.

G-20 देशांच्या प्रतिनिधींनी शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) 12: ‘जबाबदार उपभोग आणि उत्पादना’वर भारताचे लक्ष केंद्रित करण्याचे स्वागत केले. सोबतच, स्थानिक वास्तविकता आणि ज्ञान एकत्रित करण्यासाठी, व्याप्ती आणि प्रमाणाचे वर्णन करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील बदलांना सक्षम आणि प्रोत्साहन देणारे धोरणात्मक उपाय ओळखण्यासाठीही प्रशंसा केली.

हे चर्चासत्र भारताच्या विकास कार्य गटाच्या (DWG) सहअध्यक्ष गंभीर यांच्या टिप्पण्या आणि सादरीकरणासह तसेच परिणाम दस्तऐवजाच्या संदर्भाच्या अटींवर चर्चा आणि विकास कार्य गटाच्या सहअध्यक्षांच्या समारोपाच्या टिप्पण्यांसह समाप्त झाले.

संध्याकाळी विकास कार्य गटाच्या सहअध्यक्षांनी जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विकास कार्य गटाच्या उपक्रमांचे तपशीलवार आढावा आणि भविष्यातील बैठकांसाठी गटाच्या योजनांबद्दल माहिती दिली. सत्रांदरम्यान, प्रतिनिधींना भारतीय तंदुरी चाय (चहा)च्या अनोख्या चवीचा आनंद घेता आला; ज्यात गरम तंदूरमध्ये कुल्हड (छोटा मातीचा कप) ठेवण्यासाठी वापरलेल्या लोखंडी चिमट्याच्या धुराची चव मुरवलेली असते.

दोन दिवसांच्या गहन विचारमंथनानंतर, प्रतिनिधींना मुंबईच्या सांस्कृतिक आणि झपाट्याने वाढणाऱ्या शहरी महानगरात हरित मरुभूमी अनुभवण्याची संधी देण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफांची सहल उद्या नियोजित करण्यात आली आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content