Homeकल्चर +प्रेक्षकांसमोर लवकरच येणार...

प्रेक्षकांसमोर लवकरच येणार ‘डाल रोटी’!

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे काहीसे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्यांच्या आत्महत्त्यादेखील वाढत आहेत. अशा परिस्थितींत त्यांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी युवकांनी शेती करून इतरांसाठी कशी प्रेरणा निर्माण केली, याचे यथार्थ चित्रण घडविणारा ‘डाल रोटी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अफ्ताब पिक्चर्सने त्याची निर्मिती केली असून दिग्दर्शन जुली जास्मिन यांचे आहे. दिवाकर प्रवीण यांनी लेखन केले आहे तर दिशांत गुलिया, रुपाली थापा यांचा सुंदर अभिनय यात बघायला मिळणार आहे. तू मेरी सीता, हे चित्रपटातील गाणे विशेष लोकप्रिय होत आहे. अर्शान यांनी ते गायले आहे. गीतकार समीर अंजान असून संगीतदिग्दर्शन विष्णुधर मिश्रा यांचे आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content