Wednesday, June 26, 2024
Homeएनसर्कलसर्वसामान्यांचे 930 कोटी...

सर्वसामान्यांचे 930 कोटी रुपये वाचविण्यात सायबर सेल यशस्वी!

नागरिक वित्तीय सायबर फसवणूक अहवाल आणि व्यवस्थापन प्रणाली सुरू झाल्यापासून 15 नोव्हेंबर 2023पर्यंत 12.77 लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत, 3.80 लाखांहून अधिक तक्रारींमधले सर्वसामान्यांचे 930 कोटी रुपये सायबर चोरांपासून वाचले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार ‘पोलीस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हे राज्याचे विषय आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांवर, त्यांच्या कायदा अंमलबजावणी संस्थांद्वारे सायबर गुन्ह्यांसह गुन्ह्यांचा प्रतिबंध, शोध, तपास आणि खटला चालवण्याची जबाबदारी आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या उपक्रमांना त्यांच्या कायदा अंमलबजावणी संस्थांची क्षमता वाढवण्यासाठी विविध योजनांतर्गत मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून केन्द्र सरकार पूरक काम करते.

महिला आणि मुलांवरील सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांचे ऑनलाईन अहवाल देण्यासाठी नागरिकांना एक केंद्रीकृत यंत्रणा पुरवण्यासाठी गृह मंत्रालयाने 30 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर नोंदवलेल्या घटना, त्यांचे एफआयआरमध्ये रूपांतर आणि त्यानंतरची कारवाई संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश कायदा अंमलबजावणी संस्थेद्वारे कायद्याच्या तरतुदींनुसार हाताळली जाते.

‘राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल’ चा एक भाग म्हणून नागरिक वित्तीय सायबर फसवणूक अहवाल आणि व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. हे प्रारुप एक एकात्मिक व्यासपीठ प्रदान करते. यानुसार पीडितांच्या खात्यातून सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जाणारा पैशाचा ओघ रोखण्यासाठी जलद, निर्णायक आणि प्रणाली-आधारित प्रभावी कारवाई सुनिश्चित करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कायदा अंमलबजावणी संस्था, सर्व प्रमुख बँका आणि वित्तीय मध्यस्थ, देयक वॉलेट, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि ई-कॉमर्स कंपन्यांसह सर्व भागधारक एकत्रितपणे काम करतात. अशा प्रकारे जप्त केलेले पैसे नंतर योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर पीडित व्यक्तीला परत केले जातात. फसवणुकीची रक्कम मार्गस्थ करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांकडून गैरवापर केल्या जाणाऱ्या विविध वित्तीय मार्गांची ओळख पटविण्यास हे व्यासपीठ सक्षम करते. ऑनलाईन सायबर तक्रारी नोंदवण्यासाठी मदत मिळवण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक ‘1930’ कार्यान्वित करण्यात आला आहे.  

गृहमंत्रालय, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी नियमित संवाद साधते आणि नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांचा त्वरित निपटारा करण्याचा सल्ला देते.

Continue reading

मुंबईत पहिल्यांदाच दरडप्रवण ठिकाणी बसणार जिओ नेटिंग!

मुंबईतल्या घाटकोपरच्या आझाद नगर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

मुंबईतल्या सम्शानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईतल्या स्मशानभूमीत आता विद्युत आणि गॅस दाहिनींबरोबरच पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणेचा (Eco – Friendly Pyre creation system technology) वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व–पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान पालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास...

मुंबईतल्या पुलाखाली साकारले पहिले उद्यान ग्रंथालय

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने नानालाल डी. मेहता पुलाखालच्या मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ (Open Library) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याठिकाणी वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध असतील. सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) डॉ. पृथ्वीराज...
error: Content is protected !!