Homeचिट चॅटदेशातला सर्वात मोठा...

देशातला सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरू!

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर 25 मेगावॅटचा देशातला सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प उभारला आहे.

2018मध्ये केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेअंतर्गत उभारला जाणारा हा पहिला सौर प्रकल्प आहे. या सोलर पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन काल एनटीपीसीचे RED (WR2 & SR) संजय मदन यांनी केले.

या फ्लोटिंग सोलर इंस्टॉलेशनची विशिष्ट रचना असून ते RW जलाशयात 75 एकरवर पसरलेले आहे. या फ्लोटिंग सौर प्रकल्पात 1 लाखांहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमधून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. यामुळे 7,000 कुटुंबांना वीज पुरवण्यात मदत होणार  आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान 46,000 टन इतके कार्बन डायॉक्साईडचे  (CO2e) उत्सर्जन टाळता येईल.

बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे पाणी घेऊन 2,000 मेगावॅट वीजनिर्मिती करणारा कोळसा आधारित सिंहाद्री स्टेशन, हा पहिला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे, जो 20 वर्षांहून अधिक काळ हा कार्यरत आहे. याशिवाय एनटीपीसी सिंहाद्री येथे प्रायोगिक तत्त्वावर हायड्रोजन-आधारित मायक्रो-ग्रिड यंत्रणा उभारण्याची योजना आखत आहे.

66,900 मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीजनिर्मिती क्षमतेसह, एनटीपीसीकडे 29 नवीकरणीय प्रकल्पांसह 71 वीज केंद्रे आहेत. एनटीपीसीने 2032पर्यंत 60 गीगावॅट (जीडब्ल्यू) नवीकरणीय ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 5 गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसह या महामंडळाची 17 गीगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content