पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि कॅथॉलिक चर्च शासक यांनी संयुक्तपणे गोव्यात निर्मळ, धर्मनिष्ठ, साध्या, शांतताप्रिय हिंदूंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची खरी कहाणी! आपली सांस्कृतिक अस्मिता, भाषा, धर्म आणि आपल्या देवाच्या रक्षणासाठी मातृभूमी सोडून पळून जावे लागलेल्या असहाय जनतेचे हृदयद्रावक रेखाचित्र!! या सेमिटिक धर्माच्या प्रेषितांच्या चेहऱ्यावरील फसवे हास्य आणि त्यांचे मधाळ बोलणे स्थानिकांना धर्मांतराच्या अथांग गूढ गर्तेत घेऊन गेले. या परकीय वर्चस्वाला साडेचार शतके शौर्याने नाकारणाऱ्या, प्रतिकार करणाऱ्या आणि हाणून पाडणाऱ्या या निरपराध लोकांची गाथा अवर्णनीय बलिदानाद्वारे आपल्या सनातन धर्माची अस्मिता टिकवून ठेवणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आर.एस.एस.) तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्व. रंगा हरी यांनी सखोल अभ्यास आणि सखोल संशोधनानंतर हा ग्रंथ लिहिला आहे.
या पुस्तकाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना कोट्टायम (केरळ) येथील सी. एम. एस. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सी. आय. आयझॅक यांनी लिहिली आहे. ते लिहितात- या पुस्तकाचे लेखक रंगा हरी हे सांकेतिक इतिहासकारांच्या यादीत येणाऱ्यातील नाहीत. परदेशी मिशनऱ्यांच्या कृत्यांचे आंधळेपणाने कौतुक करण्याची पद्धत बहुतेक इतिहासकारांमध्ये आहे. पण त्यांनी ऐतिहासिक वस्तुस्थितीला पूर्ण न्याय देत हे पुस्तक लिहिले आहे.
अनैतिक आणि अन्यायकारक मार्गांनी, जगभरात अस्तित्त्वात असलेल्या परीक्षेला तथाकथित पॅगन धर्माचा नाश करणारी संस्था म्हणजे ख्रिस्ती चर्च ही संस्था; या प्रक्रियेत मानवाचा सर्वाधिक रक्तपात घडवून आणणारी ही संस्था आहे. ‘नैतिक दूरदर्शित्व’ टिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘इन्क्विझिशन’ आणि ‘विच-हंट’ या अनैतिक कृतींचा अवलंब करून, अवांछित असा शिक्का मारून जाळून मारल्या गेलेल्या शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांची संख्या मोजता येण्यापलीकडील आहे. या शास्त्रज्ञांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी सांगितलेले नवे ज्ञान हे कॅथॉलिक क्षत्रपांनी धर्मद्रोहाचे स्पष्ट उदाहरण मानल्याची अनेक उदाहरणे आहेत.
पुस्तकांच्या स्वरूपात असलेला अशा ज्ञानाचा खजिना, ज्यात अलेक्झांड्रियामधील ग्रेट लायब्ररीच्या कुख्यात जाळपोळीचादेखील समावेश होता, तो त्यांनी जाळून टाकला. इतिहासाच्या एका प्रामाणिक विद्यार्थ्याच्या दृष्टीने भारतातील प्राचीन काळातील सर्वात प्रतिष्ठित नालंदा विद्यापीठ नष्ट करणारा कुख्यात लुटारू मोहम्मद बख्तियार खिलजी आणि हे ख्रिश्चन संप्रदाय धार्मिक कट्टरतेच्या बाबतीत समान आहेत. कट्टरतावादी वृत्तीत चर्चने दरोडेखोर खिलजीला मागे टाकले की काय याची आपण खात्री करून घेऊ शकतो.
याच खिश्वन चर्चच्या अनुयायांनी भारतीय भूमीत पाय रोवले होते आणि हिंदू संस्कृती आणि धर्म नष्ट करण्यासाठी अनेक सैतानी युक्त्या अवलंबल्या होत्या. परंतु हिंदू समाजाने धाडसी प्रतिकार करून या प्रयत्नांना पराभूत केले. म्हणूनच भारतात आजही हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्क्यांहून अधिक आहे. जवळजवळ दोन सहस्रकांपर्यंत कष्ट करूनही चर्चला आपल्या अनुयायांसाठी एकूण लोकसंख्येत जेमतेम २% संख्येवर समाधान मानावे लागले!
ऐतिहासिक स्वरूपाच्या या ग्रंथाच्या लेखकाने या पुस्तकांच्या दुसऱ्या प्रकरणात गोव्याच्या प्रदेशातील ख्रिश्चन धर्मांधता आणि असहिष्णुतेचे मूल्यमापन अशा प्रकारे केले आहेः मुघल बादशहा औरंगजेब आणि आक्रमक खिलजी घराण्याने मिळून इतक्या कमी कालावधीत आणि एवढ्या कमी भूभागावर एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू मंदिरे जमीनदोस्त केली नव्हती. याचे श्रेय फिरंगी आणि पाद्री यांना द्यावे लागेल. विशेष म्हणजे असे असूनही हिंदुत्वनिष्ठ असलेल्या लेखकाने हे सर्व जघन्य गुन्हे करणाऱ्या चर्च धर्म आणि ख्रिश्चन चर्च यांच्याविषयी कोणतेही वैर दाखविलेले नाही.
एवढेच नाही तर, कॉन्स्टंटाइन युगानंतर उदयास आलेल्या संस्थात्मक किंवा संघटित चर्चधर्मापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र प्रवचनांना आपण सहजपणे वेगळे करतो हे मोकळ्या मनाने जाहीर करण्यास तो मागेपुढे पाहत नाही. इतके सहिष्णू मत सच्चा हिंदू सोडून दुसरा कोण जाहीर करेल? गोव्यातील हिंदू ४५१ वर्षांच्या दुःखांनी भरलेल्या आणि दडपशाहीच्या २०० वर्षांच्या राजवटीच्या काळाचा सूड उगवण्यापासून परावृत्त होऊ शकले, हा त्यांच्या विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेचा एक स्पष्ट पुरावा आहे. प्रभू येशूनी आपल्या अनुयायांना त्यांच्या गालावर थप्पड मारणाऱ्या उपद्रवी व्यक्तीला दुसरा गाल दाखवा असे सांगितले होते, ते स्वीकारणे त्यांच्याच सभेला कधीही शक्य झाले नाही.
फ्रान्सिस्कन, डोमिनिकन आणि जेसुईट पंथाच्या पुजाऱ्यांनी गोव्यातील हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणे, पूजनीय पवित्र हिंदू धर्मग्रंथ आणि ग्रंथ जाळणे, विवाह समारंभापासून सुरू होणाऱ्या हिंदू चालीरीती आणि कर्मकांडांवर केलेले निर्लज नियंत्रण आणि मनाईचे प्रयत्न, प्रशासनाच्या छुप्या संगनमताने कोवळ्या वयोगटातील मुलांचे गुपचूप अपहरण करून ख्रिश्चन धर्म स्वीकारायला भाग पाडणे अशा घटनांचा समावेश असलेला, गोव्यातील हिंदू समाजाला भोगाव्या लागलेल्या ज्वलंत अत्याचारांचा प्रदीर्घ इतिहास या पुस्तकातून वाचकांसमोर मांडण्यात आला आहे. या किस्से-कहाण्यांमुळे वाचकांच्या मनात काही शंका निर्माण होण्याची शक्यता आहे! अशा क्रूर कृत्यांचा भागीदार असूनही फ्रान्सिस झेवियरसारख्या व्यक्तीला पवित्र संताचा दर्जा कसा मिळू शकतो? अशा संतांची प्रार्थना केली तर ते पाप ठरू नये का, असा संशयही वाचकांच्या मनात येऊ शकतो. अशी शंका आली तर ती चूक आहे असे म्हणता येत नाही.
हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित लिहिलेले हे पुस्तक आहे.
गोव्यातील धर्मांतर: कथा आणि व्यथा
लेखक: रंगा हरी
मराठी अनुवाद: सुनेत्रा जोग
प्रकाशक: भारतीय विचार साधना
मूल्य: २०० रुपये / पृष्ठ-१७६
पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण, (8383888148, 9404000347)