Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बोगस रुग्णाला मदत!

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य दिले गेल्याची कबुली मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नुकतीच दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस आयुक्तांना कळविले आहे.

मुख्यमंत्री

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे का, त्याची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी गलगली यांना कळविले की, डॉ. अनुदूर्ग ढोणी गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आंबिवली पूर्व, ठाणे या रुगणालयाने बनावट कागदपत्रान्वये अर्थसहाय्य प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ती यांचा संशय आल्याने पुढील चौकशी करुन आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांना दिनांक. 06.11.2023च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी संपूर्ण विवरणासहित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अशी अनेक प्रकरणे बाहेर येतील आणि बोगसगिरीवर आळा बसेल. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content