Homeटॉप स्टोरीकेंद्र सरकार सुरू...

केंद्र सरकार सुरू करणार डायमंड इम्प्रेस्ट लायसन्स!

भारतातील रत्न आणि आभूषणे निर्यातीमध्ये एमएसएमई उद्योगांचा मोठा वाटा आहे. डायमंड इम्प्रेस्ट परवाना हे सुनिश्चित करतो की, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त हिरे निर्यातीची उलाढाल असलेल्या भारतीय हिरे व्यापार्‍यांना मागील तीन वर्षांच्या सरासरी निर्यात उलाढालीच्या किमान 5%, (जर नसेल, तर पूर्वीप्रमाणे 10%) आयातीची परवानगी दिली जाईल. त्यामुळे डायमंड इम्प्रेस्ट लायसन्सचा फायदा एमएसएमई, अर्थात सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांमधील निर्यातदारांना होईल. याकरीता डायमंड इम्प्रेस्ट लायसन्स सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल केली.

रत्ने आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदद्वारे मुंबईत आयोजित, 40व्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो  2024मध्ये संवादात्मक चर्चेदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव येथे 9 ते 13 ऑगस्ट 2024दरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात सोने आणि दागिन्यांची आयात अधिकृत माध्यमांद्वारे होईल आणि आपल्या देशातील कामगारांना काम मिळेल. जागतिक मंदीमुळे निर्यातीमध्ये झालेला तोटा भारताची देशांतर्गत बाजारपेठ लवचिकतेने भरून काढत आहे आणि वेगाने विकसित होत आहे. रत्न आणि आभूषण  निर्यातदारांनी सकारात्मक राहवे. भारत सरकार G7 देशांबरोबर सक्रियपणे काम करत असून, संबंधित केंद्रीय मंत्री वाटाघाटींमध्ये सहभागी झाले आहेत. आम्ही युरोपियन युनियनचे मंत्री आणि आयुक्तांशी विस्तृत चर्चा करत आहोत. पारदर्शकता, डेटा संरक्षण आणि खर्चाचे मुद्दे आहेत. मात्र भारताची G7 देशांबरोबर पूर्ण क्षमतेने वाटाघाटी करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई किंवा सूरतमध्ये अँटवर्पमधील केंद्रासारखे केंद्र असावे. हिऱ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही डी बियर्स किम्बर्ले प्रोसेसबरोबरदेखील चर्चा करत आहोत. तथापि, या संदर्भात कोणतीही तांत्रिक यंत्रणा आणि कोणताही प्रोटोकॉल (शिष्टाचार) नसून, आम्ही यासाठी संयुक्तपणे काम करत आहोत, असे गोयल म्हणाले.

रत्ने आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाह यांनी सरकार, मंत्री आणि मंत्रालयाच्या पुढाकाराची प्रशंसा केली, ज्यामुळे भारत-संयुक्त अरब अमिरात CEPA, भारत-ऑस्ट्रेलिया ECTA, भारत-EFTA TEPA, यासारख्या परराष्ट्र व्यापार करारांवर स्वाक्षरी झाली. भारत-संयुक्त अरब अमिरात CEPA मुळे युएईमध्ये होणार्‍या रत्न आणि दागिने निर्यातीत 40% इतकी मजबूत वाढ झाली, असे त्यांनी सांगितले.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content