Homeकल्चर +५ व ६...

५ व ६ मे रोजी मुंबईकरांसाठी व्यंगचित्र महोत्सवाची मेजवानी

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईन, या संस्थेतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईतल्या ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ पूर्व येथे व्यंगचित्र संमेलन आयोजित करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुभाष देसाई यांची या संमेलनाला विशेष उपस्थिती असणार आहे. दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत रसिकांसाठी हे व्यंगचित्र प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.

कार्टूनिस्ट्स कंबाईन ही १९८३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे स्थापन केलेली अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संस्था असून संस्थेतर्फे दरवर्षी विविध शहरांतून भव्य व्यंगचित्रकार संमेलने घेतली जातात. या वर्षी मुंबईत हे संमेलन होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, शिवसेना (उबाठा) आमदार संजय पोतनीस, ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी केले आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यंगचित्र प्रदर्शन, व्यंगचित्र स्पर्धा, व्यंगचित्रविषयक प्रशिक्षण देणारी नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकांसह व्याख्याने, परिसंवाद असे आहे. रसिकांना स्वतःचे कार्टून काढून घेण्याची संधीही या संमेलनात मिळणार आहे. व्यंगचित्र प्रदर्शनात शंभर वर्षांपूर्वीचीही दुर्मिळ व्यंगचित्रेही पाहण्याची संधी रसिकांसाठी असेल.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content