निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठीकेंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच “1950” हेल्पलाईन क्रमांकासह देशभरामध्ये जिल्हास्तरावर ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली आहे.
याबाबतची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे-
- नागरिकांच्या सर्व शंका/तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन आणि सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जिल्हास्तरीय ‘हेल्पलाईन’ सक्रिय केल्या आहेत.
- राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाईन म्हणून सेवा देईल. रोज सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत 1800-11-1950 या टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ती उपलब्ध असेल. नागरिकांना त्यांच्या प्रश्नांमध्ये सहाय्य करणाऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनीला उत्तर दिले जाईल.
- वेळेवर आणि स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्याला अनुक्रमे स्वतःचे राज्य संपर्क केंद्र आणि जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही केंद्रे वर्षभर कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यरत राहून प्रादेशिक भाषांमध्ये मदत करतात.
- सर्व तक्रारी आणि शंका राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टलद्वारे नोंदवल्या जातात आणि त्यांचा मागोवा घेतला जातो.
- याव्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली असून याद्वारे ‘ईसीआयनेट- प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्याद्वारे, नागरिक आपापल्या बूथस्तरीय अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात.
- नागरिक ईसीआयनेट अॅप वापरून निवडणूक अधिकाऱ्यांशीदेखील संपर्क साधू शकतात. आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी यांना नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण करण्याचे आणि वापरकर्त्यांच्या विनंतीचे 48 तासांच्या आत निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.
- निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यमान यंत्रणेव्यतिरिक्त नागरिक complaints@eci.gov.in वर ईमेलदेखील पाठवू शकतात.

