Thursday, November 7, 2024
Homeचिट चॅटयंदाच्या भक्तिरास नवरात्र...

यंदाच्या भक्तिरास नवरात्र महोत्सवाचे भूमीपूजन संपन्न

मुंबईतले बोरिवली हे नवरात्रोत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या “भक्तिरास नवरात्र महोत्सव 2024″साठी भूमिपूजन, वास्तुपूजन आणि कलश पूजन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या “भक्तिरास नवरात्र महोत्सव 2024″च्या भूमिपूजनप्रसंगी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी सादर केलेल्या आणि दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात अधिकाधिक बोरिवली स्थानिकांना तसेच मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे. यावेळी सुनील राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भक्तिरास नवरात्र महोत्सवात नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि संगीत असणार आहे. बोरिवली हे गुजराती सामाजिक संस्कृती आणि परंपरेचे केंद्र आहे. यावर्षी बॉलीवूड गाण्यासह पारंपरिक संगीतावर नवरात्रोत्सवाची रंगत द्विगुणित करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content