Homeमाय व्हॉईसदीपावलीत सतर्क राहा...

दीपावलीत सतर्क राहा ऑनलाईन फसवणुकीपासून!

दीपावलीनिमित्त देशभरात जल्लोश सुरू होत आहे. सणासुदीचा काळ म्हटले की, प्रत्यक्ष खरेदीबरोबरच ऑनलाईन खरेदी, दूरचा प्रवास, त्यासाठी होणारे ऑनलाईन आरक्षण, गुंतवणुकीसाठी ऑनलाईन ऑफर, शुभेच्छांसाठी होणारा सोशल मीडियाचा वापर आदींची रेलचेल असते. सायबर क्राईम करणारे ऑनलाईन गुन्हेगारांकरीता हा काळ पर्वणीच ठरतो. सायबर गुन्हेगार अशा या सुगीच्या काळात बनावट ऑफर्स, फोनवरील धमक्या तसेच फसवणुकीच्या माध्यमातून आपले सावज हेरतात आणि लाखो रुपयांना ठकवतात. सर्वसामान्यांची ही फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सायबर गुन्हेगार वापरत असलेल्या पद्धती, सर्वसामान्यांनी घ्यावयाची काळजी आणि फसविले गेल्यास काय करावे याची ही थोडक्यात माहितीः

१. ऑनलाईन बुकिंग फसवणूक-

फसवणुकीची कार्यपद्धती- बनावट वेबसाइट्सवरून हॉटेल, फ्लाइट, बसचे बुकिंग. Google वर खोटे कस्टमर केअर नंबर व QR कोड पाठवून पेमेंट मागणे. बुकिंग केल्यानंतर संपर्क बंद.

धोक्याची घंटा- अनोळखी वेबसाइट्सवर सवलतींचे आमिष. बुकिंगपूर्वी Google वर सापडलेल्या नंबरवर लगेच कॉल करून पडताळणी करणे. QR कोड पाठवून पेमेंट मागणे. “तुमचे बुकिंग अडकले आहे” म्हणत घाई करणे.

धोका टाळण्यासाठी- फक्त अधिकृत वेबसाइट्स/अॅप्स वापरा. कस्टमर केअर नंबर अधिकृत साइटवरूनच घ्या. QR कोडवर क्लिक करू नका. बुकिंगची पुष्टी ईमेल/SMSद्वारे तपासा.

२. खरेदी व डिस्काऊंट फसवणूक-

फसवणुकीची कार्यपद्धती- Instagram / Facebook वर खोट्या ब्रँडच्या जाहिराती. “Buy 1 Get 3” किंवा “Festive Sale”चे आमिष. पेमेंट घेतल्यावर वस्तू न पाठवणे. बनावट ट्रॅकिंग लिंक.

धोक्याची घंटा- खूपच कमी किंमतीत ब्रँडेड वस्तू. फक्त WhatsApp वरून ऑर्डर घेणे. COD (कॅश ऑन डिलीव्हरी) पर्याय न देणे. ट्रॅकिंग लिंक क्लिक करताच अडचण.

धोका टाळण्यासाठी- अधिकृत ब्रँड वेबसाइट/अॅप वापरा. COD पर्याय निवडा. सोशल मीडियावरील जाहिरातींची सत्यता तपासा. ट्रॅकिंग लिंकवर क्लिक करण्याआधी URL तपासा.

ऑनलाईन

३. डिजिटल एरेस्ट फसवणूक (विशेषतः ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी)-

फसवणुकीची कार्यपद्धती- CBI, ED, NIA, RBI अधिकारी असल्याचे भासवणे. व्हिडिओ कॉलवर गणवेश, बनावट ID, कोर्ट आदेश दाखवणे. “तुमचे खाते मनी लॉन्डरिंग चौकशीखाली आहे”, “डिजिटल अटक” व २४x७ देखरेखीच्या धमक्या देणे. RBIमध्ये पैसे “सुरक्षित” आहेत असे सांगणे. सतत व्हिडिओ कॉलवर ठेवणे. “सुरक्षित खात्यात” पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडणे. आधार, पॅन, पासपोर्ट यांची बनावट प्रत दाखवणे.

धोक्याची घंटा- गणवेशात “अधिकाऱ्यांचा” व्हिडिओ कॉल. अटक, मालमत्ता जप्तीच्या धमक्या. RBI तुमचे पैसे ठेवत आहे म्हणणे. गुप्तता पाळण्याचे आदेश देणे. पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करणे.

धोका टाळण्यासाठी- कॉल त्वरित बंद करा. पैसे ट्रान्सफर करू नका. १९३० या मोफत दूरध्वनी क्रमांकावर कॉल करा. www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. विश्वासू कुटुंबियांना माहिती द्या. जवळच्या पोलिस स्टेशनला भेट देऊन तक्रार करा.

४. गुंतवणूक फसवणूक-

फसवणुकीची कार्यपद्धती- WhatsApp/Telegram वरून “गॅरंटेड रिटर्न”चे आमिष. बनावट अॅप्स, वेबसाइट्स तयार करणे. “SEBI नोंदणीकृत सल्लागार” असल्याचा दावा करणे. सुरुवातीला थोडा परतावा देऊन विश्वास संपादन करणे. नंतर मोठी गुंतवणूक करण्यासाठी मागणी करणे. पैसे गुंतवल्यानंतर काही वेळाने अॅप/वेबसाइट बंद करणे.

धोक्याची घंटा- WhatsApp/Telegram वरून गुंतवणुकीचे आमंत्रण देणे. जलद व हमखास परताव्याचे आश्वासन देणे. SEBI नोंदणीकृत असल्याचा दावा करणे. सुरुवातीला परतावा देणे. नंतर मोठी गुंतवणूक करण्याचा आग्रह धरणे. गुंतवणुकीनंतर अॅप/वेबसाइट अचानक बंद होणे.

धोका टाळण्यासाठी- SEBI वेबसाइटवर सल्लागाराची नोंदणी तपासा. अधिकृत बँक/ब्रोकरेज प्लॅटफॉर्म वापरा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या. WhatsApp/Telegram ऑफर्स टाळा.

ऑनलाईन

५. गेमिंग/सोशल मीडिया फसवणूक-

फसवणुकीची कार्यपद्धती- गेमिंग अॅप्समध्ये “टॉप-अप” करण्यास सांगणे. मुलांना लक्ष्य करून OTP/UPI माहिती मिळवणे. Instagram वर “influencer” असल्याचे भासवून फसवणूक करणे. Dating appsवरून विश्वास संपादन करणे व आर्थिक मागणी करणे.

धोक्याची घंटा- गेमिंग अॅपमध्ये अचानक पैसे मागणे. अनोळखी व्यक्तीचा सतत संपर्क होणे. “तुम्ही खास आहात” म्हणत विश्वास संपादन करणे. आर्थिक मदतीची विनंती करणे.

धोका टाळण्यासाठी- मुलांच्या अॅप वापरावर लक्ष ठेवा. सोशल मीडिया सेटिंग्स सुरक्षित ठेवा. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळा. Dating apps वापरताना सतर्कता ठेवा.

सायबर फसवणूक झाल्यास-

आर्थिक व्यवहाराचा स्क्रीनशॉट व व्यवहार तपशील जतन करा

1930 दूरध्वनी क्रमांकावर त्वरित कॉल करा

https://www.cybercrime.gov.in या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर तक्रार करा.

पोलिस किंवा वैद्यकीय मदतीसाठी ११२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

आपत्कालीन संपर्क-

सायबर हेल्पलाइन: १९३०

सायबर क्राइम पोर्टल: www.cybercrime.gov.in

RBI ग्राहक हेल्पलाइन: १४४४०

आपत्कालीन सेवा: ११२ तसेच स्थानिक पोलिस स्टेशन किंवा सायबर सेल.

(लेखक संजय शिंत्रे (आयपीएस) महाराष्ट्र सायबर, मुंबई विभागात पोलीस उपमहानिरीक्षक आहेत.)

ई-मेलः dig.cbr-mah@gov.in

दूरध्वनी क्रमांकः ९९६७४४००७६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

Skip to content