Homeचिट चॅटबाबासाहेब पुरंदरेंचे निकटवर्तीय...

बाबासाहेब पुरंदरेंचे निकटवर्तीय दादा हाडप गुरुजी यांचे निधन

शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सहकारी आणि अंबरनाथ येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय चिंतामण उर्फ दादा हाडप गुरुजी यांचे काल (मंगलवारी) अल्पकालीन आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.

हाडप गुरुजी यांची प्रकृती काल दुपारनंतर खालावली. त्यांना प्रथम अंबरनाथ येथील डेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही प्रकृती आणखी खालवल्यावर तत्काळ ठाणे येथील विठ्ठल सायन्ना रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवकाळापासून प्रतापगडावरील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पूजेचा मान हाडप कुटुंबियांना आहे. हाडप गुरुजी अर्थात दादांनी ही सेवा अनेक वर्षे मनोभावे केली. हाडप गुरुजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निकटवर्तीयांमधील एक होते. जाणता राजा, या महानाट्याचा प्रारंभ भवानी मातेच्या पूजनाने होत असे. ही पूजा हाडप गुरुजी यांच्या हस्ते करण्यात येत असे.

२९ जुलै रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात हाडप गुरुजी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी आशीर्वादपर मंत्रपठण केले होते. त्या भेटीमध्ये हाडप गुरुजी आणि बाबासाहेब अतिशय भारावून गेल्याचे पाहावयास मिळाले होते.

गेली अनेक वर्षे हाडप गुरुजी अंबरनाथ शहरात वास्तव्यास होते. अभियंता जितेंद्र आणि अभिनेते, निवेदक जगदीश हे त्यांचे पुत्र होत. दादा हाडप यांच्या अचानक झालेल्या देहावसानामुळे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हितचिंतकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content