Homeबॅक पेजलष्करप्रमुख जनरल मनोज...

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना महिन्याची मुदतवाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज सी. पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जनरल पांडे 31 मेऐवजी 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होतील.

सरकारने लष्करी नियम 1954 च्या नियम 16 अ (4) अंतर्गत पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्ती वयापेक्षा (31 मे 2024) एक महिन्याच्या अधिक कालावधीसाठी म्हणजे 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्यांची 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. डिसेंबर 1982मध्ये त्यांची अभियांत्रिकी लष्करी तुकडीत (द बॉम्बे सॅपर्स) नियुक्ती झाली होती. लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून कामकाज पाहिले होते.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content