Homeएनसर्कलअनुसूचित जातीतल्या उद्योजकांनी...

अनुसूचित जातीतल्या उद्योजकांनी अनुदानासाठी करा अर्ज

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर तसेच शहर जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील मांग / मातंग / मिनी, मादींग / दानखणी मांग / मांग महाशी / मदारी / राधेमांग / मांग गारुडी / मांग गारोडी / मदारी / मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांनी उद्योग / व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रमानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ३० व मुंबई शहर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेतंर्गत भौतिक उद्दिष्ट ३०चे प्राप्त असून अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई- ४०००५१, या पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय १८ ते ५० वर्ष असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ३ लाखांपेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव / प्रशिक्षित असावा. अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्र / करारपत्रे / कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content