Homeचिट चॅटयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पारितोषिकासाठी आवाहन

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दरवर्षी दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. यंदाचे म्हणजेच २०२१ वर्षासाठीचे हे पारितोषिक कृषि-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येणार आहे. रोख रक्कम 2 लाख रुपये व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.

या पारितोषिकासाठी सुयोग्य संस्था व व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी व पोरितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२१ या पत्त्यावर किंवा दूरध्वनी ७२०८३९४१४४,  ०२२-२२०२८५९८ वर संपर्क साधावा. पारितोषिकासाठी नावे पाठविण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर २०२१ अशी आहे.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहिले आहे.

कम्युनिटी मेडिकल सर्व्हिसेसचा अभ्यासक्रम

गेली २० वर्षे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ डिस्टन्स एज्युकेशनच्या वतीने कम्युनिटी मेडिकल सर्व्हिसेस अँड इशेन्शिअल ड्रग्ज (सीएमएस अँड ईडी) हा एलोपथी विषयावरील वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

त्याचबरोबर बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., बी.एड., फार्मसी, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, एल.एल.बी. अशा ३५०हून अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना संकटामुळे घरी बसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षादेखील देता येतील. तसेच अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीने पूर्ण येतील. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२२५०८२८७.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content