Homeएनसर्कलपंतप्रधान मोदींबरोबर दीपिका...

पंतप्रधान मोदींबरोबर दीपिका पदुकोणही करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी, 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदर्शनसह अनेक माध्यमांतून ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यातून ते सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून निवडक 36 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतील. मानसिक आरोग्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंत, अशा विविध विषयांमधील श्रेष्ठ तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भावनिक आरोग्य आणि स्व-प्रगटीकरण यांचे महत्त्व याबद्दल दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांशी चर्चा करतील.

या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना परीक्षेची तयारी, तणाव व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास या विषयांवर मार्गदर्शन करतील. राज्य/केंद्रशासित प्रदेश मंडळाच्या सरकारी शाळा, केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, सीबीएसईच्या शाळा (CBSE) आणि नवोदय विद्यालयांतून या वर्षी एकूण 36 विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम एक नवीन अध्याय सुरू करत आपल्या आठ भागांच्या या कार्यक्रमाला एका रोमहर्षक नवीन स्वरूपात उलगडेल. यावेळी पंतप्रधानांसोबतचा झालेला पहिला संवाद दूरदर्शन, स्वयम, स्वयंप्रभा, पीएमओ यूट्यूब चॅनल आणि शिक्षण मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समाजमाध्यम चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. देशभरातील दर्शकांना या समृद्ध अनुभवामध्ये सहभागी होता येईल.

दीपिका

या कार्यक्रमाच्या सर्व भागांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • क्रीडा आणि शिस्त: एमसी मेरी कोम, अवनी लेखारा, सुहास यथीराज हे उद्दिष्टनिश्चिती, सातत्य, आणि शिस्तबद्धतेतून तणाव व्यवस्थापन यावर संबोधित करतील.
  • मानसिक आरोग्य: भावनिक आरोग्य आणि स्व-प्रगटीकरण यांचे महत्त्व याबद्दल दीपिका पदुकोण चर्चा करतील.
  • पोषण: आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी आणि शैक्षणिक स्तरावरच्या यशामध्ये उत्तम झोपेची भूमिका या विषयांवर सोनाली सबरवाल आणि ऋजुता दिवेकर प्रकाश टाकतील. फूडफार्मर म्हणून प्रसिद्ध असणारे रेवंत हिमतसिंगका ‘आरोग्यपूर्ण जीवनपद्धती आचरणात आणणे’ यावर माहिती देतील.
  • तंत्रज्ञान आणि अर्थनियोजन: गौरव चौधरी म्हणजेच टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता या उत्तम शिक्षण तसेच आर्थिक साक्षरता यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याबद्दलची माहिती देतील.
  • सर्जनशीलता आणि सकारात्मकता: कल्पनादर्शन आणि नकारात्मक विचारांचा विळखा सोडवणे तसेच सकारात्मक विचार जोपासणे या विषयावर विक्रांत मेस्सी आणि भूमी पेडणेकर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करतील.
  • सजगता आणि मानसिक आरोग्य: विद्यार्थ्यांना मानसिक स्पष्टता आणि लक्षप्राप्ती याबद्दल सहाय्यक ठरणारी सजगता तंत्रे सद्गुरू सामायिक करतील.
  • यशसिध्दीच्या कहाण्या: यूपीएससी, आयआयटी, जेईई, CLAT, सीबीएससी, एनडीए, आयसीएसई यासारख्या विविध परीक्षांमधले उत्कृष्ट श्रेणीतले विद्यार्थी हे सहभागीना परीक्षा पे चर्चाच्या आधीचे भाग सामायिक करतील आणि त्यांना परीक्षेची तयारी करताना तसेच प्रेरणा घेण्यासाठी विविध तयारीच्या प्रक्रियांचा कसा उपयोग झाला याबद्दल माहिती देतील.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content