Details
कोलकाता चीनमध्ये दाखल..
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
आंतरराष्ट्रीय नौदल कवायती, ताफा संचलन नि चीन नौदलाच्या ७० व्या वर्धापनदिन सोहळयात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदल पथक आय एन एस कोलकाता आणि शक्तीच्या नेतृत्त्वाखाली चीनच्या क्विंग्दो बंदरात दाखल झाले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग २३ एप्रिलला सहभागी जहाजाच्या संचालनाची पाहणी करतील. नौदल जहाजांचं, विमानं, नि पाणबुडी यांचं शक्तीप्रदर्शन, संयोजक देशाचं संघटनकौशल्य, सहकार्य बळकटीकरण, पतप्रतिष्ठा निर्माण करणे हा यामागे उद्देश असतो. त्याचबरोबर जागतिक नौसेनेपुढे आपली स्वदेशी नौका बांधणी ताकद, क्षमता, डिझाइन याचं सादरीकरण हा हेतूही साध्य होतो. हिंदुस्थानचं नौदल बळ यात दोनदा दिसून आलंय. २०११मध्ये मुंबईत तर २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे भव्य नि दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करून जगाला तोंडात बोटं घालायला भाग पाडलं होतं. आपल्या येथील मागील संचलनात ५० हून अधिक नौदलाच्या सुमारे १००पेक्षा जास्त युद्धनौका सामील झाल्या.
भारतीय स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र सज्ज स्टेल्थ प्रकारची कोलकाता नि प्रचंड क्षमतेची टॅंकर शक्ती या तिथे गेल्या आहेत. कोलकाता यावर बराक क्षेपणास्त्र बसवली असून घरगुती बनावटीची अनेक साधने जी विश्व दर्जाची आहेत. २६०० कोटी रूपये किमतीची ही बोट ३० नॉटिकल मैल वेगाने १५ हजार कि.मी. प्रवास करते. अर्ली वॉर्निंग सिस्टीम, AK 360 ही तोफ, पाणबुडीविरोधी दोन रॉकेट, चार टॉर्पेडो आणि शत्रूच्या रडार कक्षेत न येणं हे हिचे वैशिष्ट्य आहे. दोन हेलिकॉप्टर, ३० अधिकारी, ३०० नौसैनिक, चार गॅस टर्बाइन, एक डिझेल जनरेटर अशी तैनाती यावर आहे. १६ ऑगस्ट २०१४ पासून ती कार्यरत आहे. सोबत पुरवठादार म्हणून २७ हजार टन वजनाचा १५ हजार टन द्रववाहू नि इतर पाचशे टन सामान नेऊ शकेल, असा आयएनएस शक्ती हा टॅंकर आहे. या दोन नौका धाडण्यामागे भारतीय शक्ती, स्वदेशी बनावटक्षमता दाखवणे हा उद्द्येश आहे.
आपल्या बंदरातील वास्तव्यात नौदल, सहभागी देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिनी नौदल, इतर सरकारी यंत्रणा, व्यावसायिक यांच्याशी विचारविमर्श करेल. खेळाचे सामने होतील. सदर जहाज चिनी नौसेना, स्थानिक लोक यांच्यासाठी पाहण्यास खुलं ठेवलं जाणार आहे.”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार